मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : इंजिनिअर मढवालची रेकॉर्डब्रेक कामगिरी, भले भले बॉलरही जवळपास नाहीत!

IPL 2023 : इंजिनिअर मढवालची रेकॉर्डब्रेक कामगिरी, भले भले बॉलरही जवळपास नाहीत!

इंजिनिअर आकाश मढवालची विक्रमी कामगिरी (Photo- IPL/Twitter)

इंजिनिअर आकाश मढवालची विक्रमी कामगिरी (Photo- IPL/Twitter)

आयपीएल 2023 च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जाएंट्सना धूळ चारली आहे. आकाश मढवाल मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chennai, India

चेन्नई, 24 मे : आयपीएल 2023 च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जाएंट्सना धूळ चारली आहे. मुंबईने दिलेल्या 183 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊचा 101 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे मुंबईने 81 रनने विजय मिळवला. मुंबईच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो आकाश मढवाल. आकाशने 3.3 ओव्हरमध्ये 5 रन देऊन 5 विकेट घेतल्या.

या कामगिरीसोबतच मढवालने आयपीएल इतिहासातल्या अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आयपीएल इतिहासातली अनकॅप बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी 2018 साली पंजाबकडून खेळताना हैदराबादविरुद्ध अंकीत राजपूतने 14 रनवर 5 विकेट घेतल्या होत्या. वरुण चक्रवर्तीने दिल्लीविरुद्ध 20 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. तर उमरान मलिकने गुजरातविरुद्ध 25 रन देऊन 5 विकेट मिळवल्या होत्या.

आयपीएलमधल्या सर्वोत्तम कामगिरीच्या यादीमध्ये आकाश मढवाल पाचव्या क्रमांकावर आला आहे. अल्झारी जोसेफने मुंबईकडून खेळताना 12 रनवर 6 विकेट घेतल्या होत्या, ही आजही आयपीएलमधली सर्वोत्तम कामगिरी आहे. तर सोहेल तनवीरने सीएसकेविरुद्ध 14 रनवर 6 विकेट, एडम झम्पाने हैदराबादविरुद्ध 19 रनवर 6 विकेट तर अनिल कुंबळेनेही राजस्थानविरुद्ध 5 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या.

इंजिनीअरिंग ते क्रिकेटर, एकेकाळी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा, आता बनला मुंबईचा तारणहार

आयपीएल प्ले-ऑफच्या इतिहासातली आकाश मढवालची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी डग बॉलिंगरने 2010 सालच्या सेमी फायनलमध्ये 13 रनवर 4 विकेट, जसप्रीत बुमराहने 2020 च्या क्वालिफायर1 मध्ये 14 रनवर 4 विकेट, तर धवल कुलकर्णीने 2016 च्या क्वालिफायर1 मध्ये 14 रनवर 4 विकेट घेतल्या.

लखनऊविरुद्धच्या या विजयासह मुंबई आणखी एका फायनलच्या जवळ पोहोचली आहे. आता मुंबईचा पुढचा सामना क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. ही मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुक्रवारी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारी टीम रविवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आयपीएल फायनल खेळेल.

First published:
top videos

    Tags: IPL 2023, Mumbai Indians