मुंबई, 14 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या 11व्या हंगामात पहिल्यांदाच कोणत्या तरी स्पर्धकानं 1 कोटी रुपये जिंकण्याची कामगिरी केली. या स्पर्धेकाचे नाव आहे बिहारच्या जहानाबादचा सनोज राज. मात्र, सनोजला 7 कोटींच्या जॅकपॉट प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. या प्रश्नावरून सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या हंगामात सनोज 1 कोटी जिंकणारा पहिलाच स्पर्धेक ठरला आहे. मात्र 7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून सध्या सोशल मीडियावर महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ट्रोल केले जात आहे. केबीसीच्या 11व्या हंगामात जॅकपॉट प्रश्न, ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज डॉन ब्रॅडमॅन यांनी कोणत्या भारतीय गोलंदाजाच्या चेंडूवर एक धाव काढत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले 100वे शतक पूर्ण केले होते. या प्रश्नावरून सोशल मीडियावर हर्षा भोगले, आकाश चोप्रा यांशिवाय सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांना टॅग करून या प्रश्नाचे उत्तर द्या, असे सांगण्यात आले. या कार्यक्रमात सनोज यांच्यासोबत त्यांचे वडिल आणि काका आले होते. एक कोटी जिंकल्यानंतर त्यांनी ही बातमी आपल्या आईला फोन करून सांगितली, तसेच ही रक्कम आपल्या बाबांनी समर्पित केली. दरम्यान या प्रश्नासाठी सनोज यांना चार पर्याय देण्यात आले होते. बका जिलानी, सी रंगचारी, गोगुमल किशन चंद आणि कंवर राय सिंग असे चार पर्याय देण्यात आले होते. यावर सनोज यांनी, “हा प्रश्न खुप कठिण असून नियमानुसार जॅकपॉट प्रश्नासाठी लाईफलाईनचा वापर केला जात नाही. त्यामुळं 1 कोटी रुपयांवर समाधान मानतो”, असे सांगितले. वाचा- पहिल्या टी-20 सामन्याआधी चाहत्यांसाठी मोठी बातमी, असं असेल धर्मशालाचं हवामान
@SrBachchan Sir i think that even God of cricket @sachin_rt would not be knowing the answer to this ₹ 7 crore question. Well played Sanoj. So patient and humble guy.
— Vivek Sharma (@NitiVidur) September 13, 2019
वाचा- मुंबईकर अथर्व अंकोलेकरची ‘बेस्ट’ कामगिरी! सातव्यांदा भारतानं जिंकला आशियाई कप या प्रश्नाचे उत्तर गोगुमल किशनचंद होते. सनोज हा KBC-11चा 1 कोटी जिंकणारा पहिला स्पर्धक ठरला. त्यानं 15 प्रश्नांची उत्तर देत 7 कोटींच्या 16 व्या प्रश्नापर्यंत पोहोचला होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नाही. सनोज हा बिहारच्या जहनाबादमधील एका लहान गावात राहणारा आहे. त्याचं शिक्षण बीटेक पर्यंत झालं असून असिस्टंट कमांडेट म्हणून पॅरा मिलिटरी फोर्समध्ये त्याची निवड झाली आहे. मात्र तो सध्या शासकीय सेवेच्या स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. IAS अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न आहे. वाचा- KBCमध्ये 20 हजारांच्या प्रश्नासाठी भाजप प्रवक्ता संबित पात्रांच्या नावाचा पर्याय गणपती मंडपात नागिन डान्स करताना तरुण कोसळला, काही क्षणात सोडला जीव LIVE VIDEO