KBC मध्ये 20 हजारांच्या प्रश्नासाठी भाजप प्रवक्ता संबित पात्रांच्या नावाचा पर्याय

KBC मध्ये 20 हजारांच्या प्रश्नासाठी भाजप प्रवक्ता संबित पात्रांच्या नावाचा पर्याय

'कौन बनेगा करोडपती'च्या शुक्रवारच्या भागात 20 हजार रुपयांच्या प्रश्नासाठीच्या उत्तरांच्या पर्यायांमध्ये संबित पात्रा यांचं नाव आलं.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता संबित पात्रा अनेकदा त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या खास अंदाजासाठी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक 2019मध्ये ओडिसाच्या पुरी लोकसभा निवणुकी दरम्यान त्यांचा प्रचार सुद्धा खूप गाजला होता. हेच करण होतं 'कौन बनेगा करोडपती'च्या शुक्रवारच्या भागात 20 हजार रुपयांच्या प्रश्नासाठीच्या उत्तरांच्या पर्यायांमध्ये  संबित पात्रा यांचं नाव आलं.

KBC-11 मध्ये पहिल्या पायरीच्या 20 हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांसाठी उत्तरांच्या पर्यायांसाठी ,स्पर्धकाला एका राजकीय नेत्याचा आवाज ऐकवण्यात आला. ज्यानंतर दिलेल्या पर्यायांमध्ये अमिताभ बच्चन यांनी चार पर्याय दिले. ज्यात राजनाथ सिंह, अमित शाह, रविशंकर प्रसाद यांच्यासह शेवटचा पर्याय हा संबित पात्रा यांच्या नावाचा होता.

लता मंगेशकरांच्या प्रतिक्रियेवर रानू मंडलनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाल्या...

संबित पात्रा सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांनी व्हायरल होत असतात. सोसल मीडियावर त्यांचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग सुद्धा आहे. बिहारच्या सनोजला हा प्रश्न विचारण्यात आल्यावर पहिल्यांदाच हे समजलं होतं की हा आवाज देशाचे गृहमंत्री आम सर्वाधिक चर्चेत असणारे नेता अमित शाह यांचा आहे. मात्र सर्व पर्याय ऐकून घेतल्यानंतर सनोज यांनी अमित शाह यांचं नाव घेतलं.

'हस्तमैथुन करतो हे बाबांना कळलं होतं तेव्हा...' बॉलिवूड हिरोनं सांगितला किस्सा

सनोज हा KBC-11चा 1 कोटी जिंकणारा पहिला स्पर्धक ठरला. त्यानं 15 प्रश्नांची उत्तर देत 7 कोटींच्या 16 व्या प्रश्नापर्यंत पोहोचला होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नाही. सनोज हा बिहारच्या जहनाबादमधील एका लहान गावात राहणारा आहे. त्याचं शिक्षण बीटेक पर्यंत झालं असून असिस्टंट कमांडेट म्हणून पॅरा मिलिटरी फोर्समध्ये त्याची निवड झाली आहे. मात्र तो सध्या शासकीय सेवेच्या स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. IAS अधिकारी  होण्याचं त्याचं स्वप्न आहे.

श्रद्धा कपूर 6 वर्षांपासून 'या' गंभीर आजाराविरोधात देतेय लढा

===============================================================

VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, 'आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं'

Published by: Megha Jethe
First published: September 14, 2019, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading