मुंबई,01 डिसेंबर: भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि आथिया शेट्टी हे रिलेशनशिपमध्ये असून गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांच्या लग्नासाठी दोघांच्या कुटुंबियांची भेटही झाल्याचं म्हटलं जात आहे. केएल राहुल पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात आथियासोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी बीसीसीआय़कडून त्याने सुट्टीही मागितली असून त्याच्या सुट्टीला मंजुरी मिळाल्याचं सांगण्यात येतंय.
आथिया शेट्टी बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी असून ती स्वत:ही अभिनेत्री आहे. केएल राहुलने बांगलादेश कसोटी मालिकेनंतर बीसीसीआय़कडे विश्रांतीची मागणी केली आहे. केएल राहुलकडे भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे. केएल राहुल श्रीलंकेविरुद्ध भारतात होणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत आणि एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. केएल राहुल आणि आथिया शेट्टी जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार असल्याचं समजतं.
हेही वाचा : पाकिस्तानमध्ये इंग्लंडच्या संघावर व्हायरसचा हल्ला, कसोटीआधी अर्धा संघ आजारी
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेही सांगितले की, केएल राहुलने त्याच्या वैयक्तिक कामासाठी सुट्टी मागितली आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये खेळण्यासाठी गेला नाही. त्याचं काही कौटुंबिक काम आहे. मला नाही माहिती की तो लग्न करणार आहे की साखरपुडा पण त्याचे काही वैयक्तिक काम आहे इतकंच सांगू शकतो असंही अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
हेही वाचा : अय्यरने धवन, कोहलीलासुद्धा टाकले मागे; शिवाय नकोसं रेकॉर्डही नावावर
अभिनेता सुनिल शेट्टीने धारावी बँक या वेब सिरीजच्या रिलीज इव्हेंटमध्ये आथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. दोघे लवकरच लग्न करतील असं सुनिल शेट्टीने म्हटलं होतं. त्यामुळे आता केएल राहुलने ब्रेक घेतल्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Cricket, Kl rahul, Sunil shetty