ख्राइस्टचर्च, 30 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे न्यूझीलंडने मालिका 1-0 अशी जिंकली. ख्राइस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. भारताचा सलामीवीर शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास आला. एका बाजूने विकेट पडत असताना तो मैदानावर टिकून होता. बाद होण्याआधी त्याने 59 चेंडूत 49 धावांची खेळी केली. यात त्याने आठ चौकार लगावले. दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. मधल्या फळीतला फलंदाज श्रेयस अय्यर 32 एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत 1428 धावा केल्या आहेत. त्याच्याआधी शिखर धवनने 32 एकदिवसीय सामन्यात 1275 तर केएल राहुलने 1251 धावा केल्या होत्या. नवज्योत सिंग सिद्धूने 1246 आणि विराट कोहलीने 1245 तर एमएस धोनीने 1153 धावा केल्या होत्या. हेही वाचा : तिसऱ्या वन डेतही पाऊसच जिंकला… किवींनी जिंकली मालिका, टीम इंडियाचं पाहा काय चुकलं? श्रेयस अय्यरने पहिल्याच चेंडूवर अॅडम मिल्नेला चौकार लगावला होता. त्यानंतर श्रेयसने पुढच्याच षटकात मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर स्ट्रेट ड्राइव्ह मारला. यावर चाहत्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. अय्यरने न्यूझीलंविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही 76 चेंडूत 80 धावा केल्या होत्या.
हेही वाचा : तिसऱ्या सामन्यात गिल फ्लॉप; तरीही सचिन, सेहवाग आणि द्रविडला टाकले मागे तिसऱ्या सामन्यात त्याने 49 धावा केल्या. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर कॉनवेकडे झेल देऊन तो बाद झाला. यामुळे एकदिवसीय कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक पूर्ण करण्यापासून तो केवळ एका धावेमुळे दूर राहिला. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 49 धावांवर बाद होणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी माजी कर्णधार कपिल देव हे 1988 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 49 धावांवर नाबाद राहिले होते.

)







