मुंबई, 20 जून : जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक विक्रमांची नोंद भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या नावे आहे. सर्वकालीन महान खेळाडू म्हणून सचिनचा उल्लेख होतो. त्यानं आपल्या 25 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले. त्याचे अनेक विक्रम भविष्यात मोडले जातील की नाही याबाबत शंका आहे. दरम्यान, त्याचा एक विश्वविक्रम धोक्यात आल्याचं दिसत आहे. इंग्लंडचा एक बॅट्समन सचिनच्या या विक्रमाचा पाठलाग करत आहे. जो रूट, असं या खेळाडूचं नाव असून सध्या तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. जागतिक क्रिकेटमध्ये 100 शतकं ठोकणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव बॅट्समन आहे. याशिवाय, त्यानं आपल्या कारकिर्दीत 68 टेस्ट अर्धशतकं झळकावलेली आहेत. त्याच्यानंतर एकाही फलंदाजाला इतकी अर्धशतकं करता आलेली नाहीत. जो रूट मात्र, सचिनचा हा विक्रम मोडण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. Asia cup : आशिया कपमधून मिळणारे पैसे BCCI घेत नाही, काय केलं जातं कोट्यवधी रुपयांचं? सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांदरम्यान अॅशेस सीरिज सुरू आहे. याच सीरिजमध्ये रूट सचिन तेंडुलकरचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वाधिक अर्धशतकांचा विश्वविक्रम मोडण्याच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे. एजबस्टन येथे झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये त्याने नाबाद 118 रन्स, तर दुसऱ्या इनिंगमध्ये 46 रन्स केले. रुटनं टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत 58 अर्धशतकं केली आहेत. तो सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता येत्या वर्षभरात तो या बाबतीत सचिनला मागे टाकू शकतो. कारण, येत्या काळात इंग्लंडला भरपूर टेस्ट क्रिकेट खेळायचं आहे. सचिन-विराटला मागे टाकत रूटने केली अनोखी कामगिरी : एजबस्टन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नॅथन लायनच्या बॉलवर अॅलेक्स कॅरीनं जो रूटला स्टंप आउट केलं. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात रूट पहिल्यांदाच स्टंप आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमध्ये तो स्टंप आउट होण्यापूर्वी सर्वाधिक रन करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानं सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे. त्यानं आतापर्यंत 131 कसोटी सामन्यांमध्ये 11 हजार 168 रन केले आहेत. तर, पहिल्यांदा स्टंप आऊट होण्यापूर्वी विराटने 8 हजार 195 आणि सचिननं 7 हजार 419 रन केले होते.
विराट कोहली पिछाडीवर : टेस्ट क्रिकेटमध्ये अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत रनमशीन विराट कोहली फार मागे आहे. त्याने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये केवळ 28 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यामुळे स्वत: अनेक विक्रम रचणाऱ्या कोहलीला सचिनचा विश्वविक्रम मोडायचा असेल, तर येणाऱ्या काळात भरपूर रन कराव्या लागतील.

)







