जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia cup : आशिया कपमधून मिळणारे पैसे BCCI घेत नाही, काय केलं जातं कोट्यवधी रुपयांचं?

Asia cup : आशिया कपमधून मिळणारे पैसे BCCI घेत नाही, काय केलं जातं कोट्यवधी रुपयांचं?

बीसीसीआय

बीसीसीआय

Asia Cup 2023 News Update : भारताने आतापर्यंत एकूण 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. आशिया कपच्या ब्रॉडकास्टिंगमधून झालेली कमाई बीसीसीआय स्वत:कडे ठेवत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 19 जून : आशिया कप स्पर्धेचं आयोजन कुठे करायचं यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये बराच वाद झाला. आता शेड्युल जारी झाले असून हा वाद संपुष्टात आला आहे. एसीसीच्या निर्णयानुसार काही सामने पाकिस्तानात तर काही सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना श्रीलंकेत खेळवला जाईल. भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. भारताने आतापर्यंत एकूण 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. आशिया कपच्या ब्रॉडकास्टिंगमधून झालेली कमाई बीसीसीआय स्वत:कडे ठेवत नाही. माजी क्रिकेटपटूने याबाबत खुलासा केला आहे. माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोप्राने युट्यूबवर खुलासा करताना म्हटलं की, आशिया कपचा वाद अखेर संपला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की आशिया कपच्या इतिहासात जेव्हापासून आशिया कप स्पर्धा सुरू आहे. तेव्हापासून ब्रॉडकास्टमधून पैसे मिळतात. आजपर्यंत एकही रुपया बीसीसीआयने घेतला नाही. बीसीसीआय कधीची एसीसीच्या पैशांना हात लावत नाही. शतकवीर ख्वाजासाठी स्टोक्सने उभी केली फौज, शेवटी 6 फिल्डर्सच्या चक्रव्यूहात फसला   प्रत्येकवेळी जेव्हा बीसीसीआयच्या वाट्याला जितकं काही असंत ते एसीसीला दिलं जातं. ज्या देशात क्रिकेटमध्ये विकास करण्याची गरज आहे तिथे तो पैसा खर्च करता यावा यासाठी बीसीसीआय आपला वाटा घेत नाही. बीसीसीआयकडे पैसे भरपूर आहेत. इतर कोणताही देश असं करत नाही. श्रीलंका किंवा पाकिस्तान हे त्यांचे पैसे स्वत:कडे ठेवतात असंही आकाश चोप्राने म्हटलं. बीसीसीआय जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. गेल्या अनेक वर्षात बीसीसीआयने भारतात क्रिकेटमध्ये बरेच बदल केले आहेत. क्रिकेटला आणखी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. बीसीसीआयची नेटवर्थ जवळपा २ बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार १६ हजार कोटी रुपये इतकी आहे. बीसीसीआयची सर्वाधिक कमाई इंडियन प्रीमियर लीगमधून होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात