जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / FIFA WC 2022: इराणच्या टीमचा राष्ट्रगीत गायनास नकार, फिफा वर्ल्ड कपच्या मैदानात पाहा नक्की काय घडलं?

FIFA WC 2022: इराणच्या टीमचा राष्ट्रगीत गायनास नकार, फिफा वर्ल्ड कपच्या मैदानात पाहा नक्की काय घडलं?

इराण फुटबॉल टीम

इराण फुटबॉल टीम

FIFA WC 2022: स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि इराण संघातला सामना पार पडला. या सामन्याआधी जेव्हा इराणची टीम जेव्हा मैदानात उतरली तेव्हा त्यांच्या एका निर्णयानं अवघ्या फुटबॉलविश्वाचं लक्ष वेधून घेतलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दोहा-कतार, 20 नोव्हेंबर: रविवारी कतारच्या अल बायत स्टेडियमवर यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं. पण वर्ल्ड कपला सुरुवात होऊन दोन दिवसही उलटले नाहीत तोच या स्पर्धेदरम्यान एक वादग्रस्त बाब समोर आली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि इराण संघातला सामना पार पडला. या सामन्याआधी जेव्हा इराणची टीम जेव्हा मैदानात उतरली तेव्हा त्यांच्या एका निर्णयानं अवघ्या फुटबॉलविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. इराण टीमचा राष्ट्रगीत गायनास नकार इराण फुटबॉल टीमनं फिफा वर्ल्ड कपच्या आपल्या सलामीच्या सामन्यात राष्ट्रगीत गायनास नकार दिला. कतारची राजधानी दोहामधल्या खलिफा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये इंग्लंड आणि इराण संघातला हा सामना खेळवला गेला. पण जेव्हा इराणचं राष्ट्रगीत सुरु झालं तेव्हा इराणी खेळाडू निमूटपणे उभे होते. पण इराणच्या खेळाडूंनी असं का केलं? सप्टेंबरमधील ती घटना आणि विरोध… दरम्यान हा विरोध होता सप्टेंबरमध्ये घडलेल्या एका घटनेसंदर्भात. सप्टेंबर 2022 मध्ये इराणी पोलिसांनी 22 वर्षीय तरुणीला हिजाब न घातल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. याचदरम्यान पोलीस कस्टडीत असतानाच त्या तरुणीचा मृत्यू झाला.  याच घटनेच्या निषेध म्हणून इराणच्या फुटबॉल टीमनं फिफा वर्ल्ड कपच्या मैदानात विरोध प्रदर्शन केलं.

जाहिरात

इंग्लंडकडून इराणचा फडशा दरम्यान इराणविरुद्धचा हा सामना इंग्लंडनं 6-2 अशा फरकानं जिंकून विजयी सलामी दिली. इंग्लंडसमोर इराणचा बचाव कमकुवत ठरला.

पहिल्या हाफमध्येच साका, बेलिंगहॅम आणि रॅशफर्डच्या गोलच्या जोरावर इंग्लंडनं 4-0 अशी आघाडी घेतली होती. अखेर पूर्ण वेळेत इंग्लंडनं 6-2 ने हा सामना खिशात घातला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात