नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडू मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज आहेत. असाच एक आर अश्विनचा सुपरफॅन असलेल्या गोलदाजाला चेन्नइ सुपरकिंग्जनं आपल्या संघात घेतले होते. या गोलंदाजाने नाव आहे साई किशोर (R sai kishore).
फेब्रुवारी 2019मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात कोणत्याच संघानं साई किशोरला विकत घेतले नाही. अखेर CSKने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइजवर साई किशोरला संघात घेतले. साई किशोरनं तामिळनाडू क्रिकेट लीगमध्ये (TNPL) जबरदस्त गोलंदाजी करत सर्वांच्या नजरेत आला. त्यामुळे आयपीएल लिलावात त्यांना चांगली किंमत मिळेल असे वाटत होते, मात्र लिलावात त्याला कोणत्याच संघाने विकत घेतले नाही.
वाचा-दिग्गजांवर भारी पडणार 20 लाखांना विकत घेतलेला जम्मू-काश्मीरचा 'हा' युवा खेळाडू!
6 नोव्हेंबर 1996 मध्ये तामिळनाडूच्या मादीपाक्काममध्ये किशोर विजय शंकरचा जन्म झाला. किशोरनं एमबीए पूर्ण केले आहे. 23 वर्षीय शंकरनं मुंबई इंडियन्ससाठी ट्रायल दिले होते. मात्र मुंबई संघात त्याची निवड झाली नाही. त्यानंतर शंकरने CSK आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या नेटमध्येही गोलंदाजी केली. मात्र कोणत्याच संघाने लिलावात शंकरला विकत घेतले नाही. अखेर, CSKने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइजवर साई किशोरला संघात घेतले.
वाचा-...म्हणून पाणीपुरी विकणाऱ्या खेळाडूला राजस्थान संघाने 2.40 कोटींना विकत घेतलं
अश्विनचा सुपरफॅन आहे किशोर
साई किशोर सध्या दिल्ली कॅपिटल्समध्ये असेल्या आर अश्विनचा चाहता आहे. अश्विनप्रमाणेच गोलंदाजी करण्याचा साई किशोरचा प्रयत्न असतो. तामिळनाडूकडून पदार्पण करताना साई किशोरनं अश्विनसोबत वेळ घालवला होता. अश्विनप्रमाणेच किशोरही 99 क्रमांकाची जर्सी वापरतो.
वाचा-वय 25, सामने फक्त 10! तरी 'या' गोलंदाजाचा धोनी झाला फॅन, IPLमध्ये करणार पदार्पण
साई किशोरचा रेकॉर्ड
साई किशोर 2017 टीएनपीएलमध्ये 17 विकेट घेतल्या. या हंगामात सर्वात जास्त विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला. 2019मध्ये तो ट्रिची वॉरिअर्सचे कर्णधारपद त्याला देण्यात आले. 2019म्ध्ये सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही किशोर सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला. किशोरने 12 सामन्यात 20 विकेट घेतल्या.