जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020: ...म्हणून मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या खेळाडूला राजस्थान रॉयल्सनं 2.40 कोटींना विकत घेतलं!

IPL 2020: ...म्हणून मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या खेळाडूला राजस्थान रॉयल्सनं 2.40 कोटींना विकत घेतलं!

IPL 2020: ...म्हणून मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या खेळाडूला राजस्थान रॉयल्सनं 2.40 कोटींना विकत घेतलं!

दोन वेळचं अन्न नाही, राहायला जागा नाही तर स्वप्न उराशी बागळून मुंबईत आला होता ‘हा’ खेळाडू. आता झाला सर्वात यशस्वी फलंदाज!

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 सप्टेंबर : आयपीएलच्या तेराव्या (IPL 2020) हंगामाला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे बिगूल वाजणार आहे. या हंगामात युवा खेळाडूंवर सर्वांच्या नजरा आहेत. असाच एक स्टार युवा खेळाडू ज्यानं आयपीएलमध्ये पदार्पण करण्याआधीच आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तो खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal). यशस्वी सर्वांच्या नजरेत आला जेव्हा दुहेरी शतक करणारा तो जगातला सर्वात लहान खेळाडू ठरला. त्यानंतर त्यानं विजय ट्रॉफीमध्ये एका सामन्यातील पहिल्या डावात सर्वात जास्त 12 षटकार लगावण्याची कामगिरी त्यानं केली आहे. यशाच्या शिखरावर असतानाच अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये त्याची निवड झाली. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये यशस्वीला राजस्थान रॉयल्स संघानं 2.40 कोटींना विकत घेतलं. मात्र पाणीपुरी विक्रेता ते क्रिकेटर असा यशस्वीचा प्रवास मन सुन्न करणारा आहे. वाचा- कंगाल झालेल्या टीमला विकत घेऊन ‘या’ कंपनीने केलं IPL चॅम्पियन 11व्या वर्षी मुंबईत आला पण… वयाच्या 11व्या वर्षी उत्तर प्रदेशमधील भदोही इथून क्रिकेटर व्हायचे स्वप्न उराशी बाळगून मायानगरी मुंबईत आला. यशस्वीचे काका वरळी येथे राहत होते, मात्र त्यांचे घर छोटे असल्याचे सांगून त्यांनी यशस्वीची सोय आझाद मैदान येथील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये केली. मात्र दिवसभर क्रिकेट खेळल्यामुळे यशस्वी रात्री तिथेच झोपायचा. त्यांच्या कोणत्याच कामात मदत होत नसल्यामुळे त्यांनी एक दिवस त्याचं संपूर्ण सामान डेरीच्या बाहेर फेकून दिलं. अखेर राहण्याची सोय हवी म्हणून तो आझाद मैदान येथील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये आला. वाचा- वय 25, सामने फक्त 10! तरी ‘या’ गोलंदाजाचा धोनी झाला फॅन, IPLमध्ये करणार पदार्पण उदरनिर्वाहासाठी विकू लागला पाणीपुरी मुंबईत आला खरा मात्र यशस्वीला स्वतःचा उदरनिर्वाह करायचा होता. यासाठी त्यानं पाणीपुरी विकण्यास सुरुवात केली. यशस्वीच्या आयुष्यात असेही दिवस आले जेव्हा तो उपाशी पोटी झोपायचा. तसेच तो जिथे राहायचा तिथे बाथरूमची सोय नसल्यामुळे तो फॅशन स्ट्रीटला बाथरूमसाठी जायचा. अनेकदा मेणबत्तीच्या प्रकाशात तो जेवायचा. अनेक रात्री त्याला घरच्यांची आठवण यायची आणि तो ओक्शाबोक्शी रडायचा. पण काहीही झालं तरी रिकाम्या हाती घरी जायचं नाही असंच त्याने ठरवलं होतं. वाचा- IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार ‘हा’ युवा गोलंदाज! 2011मध्ये बदललं आयुष्य टीम इंडियाचे प्रशिक्षक सतीश सामंत यांनी यशस्वीबाबत सांगताना, एक खेळाडू म्हणून घडवण्याचं श्रेय त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांना जाते. ज्वाला यांनी पहिल्यांदा यशस्वीला आझाद मैदान इथे खेळताना पाहिले. 2011मध्ये ज्वाला यांनी आपली क्रिकेट अकादमी सुरू केली. स्वतः सिंहही क्रिकेटर होण्यासाठी मुंबईत आले होते. यशस्वीचा संघर्ष पाहून ज्वाला यांनी त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर यशस्वीनं आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात आणि आता आयपीएलमध्ये आपली जागा मिळवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात