नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : दिग्गद खेळाडूंसोबत खेळणं हे प्रत्येक युवा खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र दिग्गज खेळाडूनं आपली निवड करावी, आणि स्वत: संघात बोलवाव, असे क्षण मोजक्याच खेळाडूंच्या नशीबात असतात. असाच रांचीचा 25 वर्षांचा खेळाडू, ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या शैलीच्या जोरावर चक्क महेंद्रसिंग धोनीला आपलं फॅन केलं.
लिस्ट एमध्ये 10 सामन्यांचा अनुभव, 22 टी-20 सामने, एवढाच अनुभव असलेल्या एका खेळाडूला धोनीनं आपल्या चेन्नई सुपरकिंग्ज या आयपीएल संघात सामिल करून घेतले. या गोलंदाजाची शैली त्याच्या आकड्यातून कळत नसली तरी हा कोणत्याही दिग्गज गोलंदाजापेक्षा कमी नाही आहे. या गोलंदाजाचे नाव आहे मोनू कुमार (Monu Kumar).
वाचा-CSKसाठी मोठी बातमी, दीपक चाहरचा दुसरा कोरोना रिपोर्ट आला समोर
मोनू कुमार 2018 पासून चेन्नई संघात आहे. मात्र यावर्षी त्याला पदार्पण करण्याची संधी मिळेल असे दिसत आहे. मोनू कुमार हे नाव घरेलू क्रिकेटमध्ये प्रसिद्ध नाही आहे. मात्र त्याच्या गोलंदाजी स्टाइलच्या जोरावर त्याला धोनीच्या संघात स्थान मिळाले.
वाचा-IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज!
मोनू कुमारचं टॅलेंट
मोनू कुमारहा धोनी प्रमाणेच झारखंडमधील रांची येथून आला आहे. मोनू लाइन लेंथसह गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 2017मध्ये मोनू धोनीसोबत विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंड संघाकडून खेळला होता. याचवेळी धोनीची या प्रतिभावंत गोलंदाजाशी भेट झाली. मोनूची गोलंदाजी धोनीला आवडली आणि त्यानं चेन्नई संघात त्याला स्थान दिले. मोनू कुमारनं लिस्ट एमध्ये केवळ 5 धावा प्रति ओव्हर रन दिले आहेत. तर टी-20मध्ये 6.90 प्रति ओव्हर धावा दिल्या आहेत. मोनू कुमार 2014मध्ये अंडर-19 संघाचाही भाग होता. मोनूनं मोठे सामने खेळले नसले तरी चेन्नई कडून खेळण्याचा अनुभव त्याच्यासाठी फायद्याचा ठरेल.