Home /News /sport /

IPL 2020मध्ये दिग्गजांवर भारी पडणार 20 लाखांना विकत घेतलेला जम्मू-काश्मीरचा 'हा' युवा खेळाडू!

IPL 2020मध्ये दिग्गजांवर भारी पडणार 20 लाखांना विकत घेतलेला जम्मू-काश्मीरचा 'हा' युवा खेळाडू!

या 18 वर्षीय खेळाडूचे रेकॉर्ड वाचून विश्वास बसणार आहे. बेस्ट फिनिशर म्हणून आहे ओळख.

    नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : आयपीएलच्या तेराव्या (IPL 2020) हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी फेब्रुवारी 2019मध्येच खेळाडूंचा लिलाव झाला होता. या लिलावात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली, मात्र या सर्वात विषय ठरला जम्मू-काश्मीरचा एक युवा खेळाडू. सनरायजर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) संघानं या 18 वर्षीय खेळाडूला आपल्या संघात घेतले. SRH संघात डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, जॉनी बेअरस्‍टो, मनीष पांडे सारखे मोठे-मोठे आणि महागडे खेळाडू आहे. मात्र या सगळ्यात एक नाव सर्वात जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे 18 वर्षीय अब्‍दुल समद (Abdul Samad) याचे. अब्दुलला SRH ने बेस प्राइस 20 लाख रुपयांचा लिलावात खरेदी केले होते. मात्र जम्मू-काश्मीरचा हा खेळाडू पैसा वसूल असल्याचे म्हंटले जाते. वाचा-वय 25, सामने फक्त 10! तरी 'या' गोलंदाजाचा धोनी झाला फॅन, IPLमध्ये करणार पदार्पण 28 ऑक्टोबर 2001मध्ये जम्मू-काश्मीरमध्येच अब्दुलचा जन्म झाला. 2019 पासून त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानं आतापर्यंत 10 फर्स्ट क्लास, 8 लिस्ट ए आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. IPL 2020 लिलावाआधी अब्दुलला हैदराबाद संघाने शॉर्ट लिस्ट केले होते. लक्ष्मणने स्वत: अब्दुलची निवड केली होती. वाचा-IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज! आयपीएलमध्ये करू शकतो कमाल अब्दुल एक फलंदाज असून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याला फिनिशअर म्हणून ओळखले जाते. स्पिन गोलंदाजीविरुद्ध अब्दुल जास्त आक्रमक फलंदाजी करतो. मोठे शॉट खेळण्यासाठीही अब्दुल ओळखला जातो. गेल्या वर्षी झालेल्या रणजीमध्ये केवळ दोन सामन्यात खेळण्याची त्याला संधी मिळाली होती. त्यातही त्याच्या नावावर सर्वात जास्त षटकार होते. प्रथम श्रेणीमध्ये अब्दुल 112.97 च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी करतो. वाचा-मुंबईच्या टीम रूमची Virtual Tour, पाहून म्हणाल...'करा मला क्वारंटाइन' अब्दुल समदचे रेकॉर्ड 10 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अब्दुलने 112.97च्या स्ट्राइक रेटनं 592 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोत्तम खेळी 128 धावांची होती. तर 8 लिस्ट एक सामन्यात त्याने 237 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 68 धावांची सर्वोत्तम खेळी आहे. टी-20 बाबत बोलायचे झाल्यास अब्दुलने 11 सामन्यात 240 धावा केल्या आहेत. टी-20मध्ये त्याची सर्वोत्तम खेळी 76 आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: SRH

    पुढील बातम्या