मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2023: इंग्लंडच्या खेळाडूची शेवटच्या क्षणी माघार, कोचचा सल्ला धुडकावला

IPL Auction 2023: इंग्लंडच्या खेळाडूची शेवटच्या क्षणी माघार, कोचचा सल्ला धुडकावला

IPL Auction : आयपीएल ऑक्शन सुरू होण्याच्या काही तास आधी एक मोठी बातमी आलीय. पाकिस्तान दौरा गाजवणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूनं या लिलावातून माघार घेतली आहे.

IPL Auction : आयपीएल ऑक्शन सुरू होण्याच्या काही तास आधी एक मोठी बातमी आलीय. पाकिस्तान दौरा गाजवणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूनं या लिलावातून माघार घेतली आहे.

IPL Auction : आयपीएल ऑक्शन सुरू होण्याच्या काही तास आधी एक मोठी बातमी आलीय. पाकिस्तान दौरा गाजवणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूनं या लिलावातून माघार घेतली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 च्या सिझनसाठी होणारा लिलाव आता काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. या लिलावात सर्वाधिक बोली कुणाला लागणार? कोणत्या नवोदीत खेळाडूचं नशिब चमकणार? कोणता दिग्गज अनसोल्ड ठरणार? या सर्व प्रश्नांची उत्तर अगदी थोड्याच वेळात मिळणार आहेत. हा लिलाव सुरु होण्याच्या काही तास आधी एक मोठी बातमी आलीय. पाकिस्तान दौरा गाजवणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूनं या लिलावातून माघार घेतली आहे.

    कुणी आणि का घेतली माघार?

    रेहान अहमद या इंग्लंडच्या स्पिनरनं आयपीएलमधून माघार घेतलीय. त्यानं नुकत्याच झालेल्या पाकिस्तान टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडकडून पदार्पण केलं होतं. रेहानने आयपीएल लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. 40 लाख रुपये बेस प्राईज देऊन त्याला शॉर्टलिस्टही करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यानं आपलं नाव मागे घेतलं आहे. टेस्ट क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे आणि त्याच्या काऊंटी क्लबला जास्त वेळ देणार असल्याचं सांगत त्यानं माघार घेतलीय. रेहान सध्या इंग्लंडमधील लिसेस्टरशायर या काऊंटी टीमकडून खेळतो.

    अठरा वर्षांच्या रेहाननं मागच्याच आठवड्यात  पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कराची टेस्टमध्ये पदार्पण केले होते. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये दोन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या टेस्टमध्ये पाच विकेट्स घेणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून त्यानं विक्रम केला आहे.

    आयपीएल आणखी रंगतदार होणार, नव्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम लागू

    कराची टेस्टमधील विक्रम ताजा असल्यानं त्याला चांगली किंमत मिळेल अशी अनेकांची अपेक्षा होती, पण रेहाननं माघार घेत सर्वांना धक्का दिला आहे.  रेहाननं आता आयपीएलमध्ये खेळायला हवं, असं न्यूझीलंडचा माजी स्टार खेळाडू आणि इंग्लंडचा कोच ब्रेंडन मॅकल्लमचं मत होतं. इतर खेळाडूंसोबत खेळल्याने त्याला वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळेल. तो त्याला फार उपयुक्त ठरेल. वयाच्या 18 व्या वर्षी रेहान पूर्णपणे आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला आहे, असंही मॅकल्लम म्हणाला होता.

    405 खेळाडूंवर लागणार बोली

    कोचीमध्ये होणाऱ्या आयपीएल ऑक्शनमध्ये यंदा   405 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून यामध्ये 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 खेळाडू परदेशी आहेत. या 132 परदेशी खेळाडूंपैकी चार खेळाडू हे आयसीसी असोसिएट देशांचे आहेत. 119 कॅप्ड खेळाडू आहेत तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या 282 आहे.

    IPL 2023 : पुणेकर खेळाडू होणार धोनीचा वारसदार! CSK कॅम्पमधून आली मोठी बातमी

    लिलावात सहभागी झालेल्या सर्व 10 फ्रँचायझींकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी फक्त 87 जागा रिकाम्या आहेत. परदेशी खेळाडूंसाठी स्लॉटची कमाल संख्या 30 आहे. प्रत्येक फ्रँचायझीच्या संघात केवळ 25 खेळाडू असू शकतात. त्यामध्ये जास्तीत जास्त आठ परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची परवानगी आहे.

    -

    First published:

    Tags: England, IPL 2023, IPL auction, Pakistan