मुंबई, 3 डिसेंबर : पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएल सिझनसाठी तयारी सुरू झाली आहे. आजवर चार वेळा विजेतेपद पटकावणारी चेन्नई सुपर किंग्स ही आयपीएलमधील महत्त्वाची टीम आहे. सध्या 41वर्षांचा असलेल्या महेंद्रसिंह धोनीकडे टीमचं नेतृत्त्व आहे. भारतात होणाऱ्या आयपीएलच्या 16व्या सिझनमध्येही धोनीच टीमचा कॅप्टन असेल, हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, 2024मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी सीएसकेला धोनीच्या जागी नवीन कॅप्टन नेमावा लागणार आहे. सीएसकेचा माजी खेळाडू आणि सध्याचा बॅटींग प्रशिक्षक मायकेल हसीनं धोनीचा वारसदार शोधला आहे. पुणेकर ऋतुराज गायकवाड धोनीचा वारसा पेलण्यास समर्थ आहे, असं हसीनं सांगितलं आहे. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जबरदस्त फॉर्मात ऋतुराज गायकवाडनं ‘विजय हजारे ट्रॉफी’ या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे. विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या फायनलमध्ये बॅटिंग करताना त्यानं अनेक विक्रम मोडीत काढले. तो तरुण, शांत आणि उत्कृष्ट बॅट्समन आहे. भारतीय क्रिकेटमधली उगवता तारा म्हणून सध्या सर्वांचं त्याच्याकडे लक्ष आहे.
6⃣,6⃣,6⃣,6⃣,6⃣nb,6⃣,6⃣
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 28, 2022
Ruturaj Gaikwad smashes 4⃣3⃣ runs in one over! 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/cIJsS7QVxK…#MAHvUP | #VijayHazareTrophy | #QF2 | @mastercardindia pic.twitter.com/j0CvsWZeES
“सीएसके भविष्यासाठी काय योजना तयार करत आहे, हे मला माहिती नाही. पण, ऋतुराज गायकवाड धोनीप्रमाणे खूप शांत आहे. दबाव हाताळताना धोनीसारखाच तो खरोखर खूप शांत असतो. त्याच्याकडे खेळ समजून घेण्याची क्षमता आहे. तो खूप लक्षवेधक आहे. त्याच्या स्वभावामुळे, चारित्र्यामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. त्यांना त्याच्या आसपास राहणं आवडतं. त्याच्याकडे काही उत्कृष्ट नेतृत्व गुणही आहेत,” असं मायकलं हसीनं इंडियन एक्सप्रेसला सांगितलं. जडेजाचा प्रयोग फसला सीएसकेनं आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जडेजाला कॅप्टन केलं होतं. पण, टीम मॅनेजमेंटला अपेक्षित निकाल मिळाला नाही. मागील सिझन सुरू असतानाच पुन्हा एकदा धोनीकडं नेतृत्व देण्यात आलं. धोनीचं वय आणि भविष्यातील गरज बघता, गेल्या काही सिझनमध्ये टीमसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या गटातून कॅप्टन शोधला पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिंकलंस भावा! वर्ल्ड रेकॉर्ड करुनही ऋतुराजनं ‘या’ खेळाडूशी शेअर केला सामनावीर पुरस्कार ऋतुराज गायकवाडनं विजय हजारे स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध 159 बॉलमध्ये 220 रन्स केले आहेत. यामध्ये सलग सात सिक्सचाही समावेश आहे. सेमी-फायनलमध्येही त्यानं 126 बॉलमध्ये 168 रन्स केले होते. त्यामुळे त्याचा खेळ आणि नेतृत्व गुण दोन्ही चेन्नई टीमला हिताचे ठरू शकतील असं मॅनेजमेंटला वाटू शकतं. ऋतुराज कॅप्टन होईल का हे लवकरच कळेल.