मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'तो मोठा धक्का होता..' दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्टनपदावरुन हटवण्याबाबत श्रेयस अय्यरने सोडलं मौन

'तो मोठा धक्का होता..' दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्टनपदावरुन हटवण्याबाबत श्रेयस अय्यरने सोडलं मौन

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट सीरिजमध्ये (Ind vs Sri Lanka T-20 Series) चमकदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) गेल्या वर्षी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेवेळी दुखापत झाल्यानं (Shreyas Iyer Injured) त्याला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमने कॅप्टनपदावरून हटवलं होतं

पुढे वाचा ...
मुंबई, 01 मार्च: श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट सीरिजमध्ये (Ind vs Sri Lanka T-20 Series) चमकदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) गेल्या वर्षी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेवेळी दुखापत झाल्यानं (Shreyas Iyer Injured) त्याला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमने कॅप्टनपदावरून हटवलं होतं आणि ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) ही जबाबदारी सोपवली होती. यामुळे नाराज झालेल्या श्रेयसनं आजतागायत याबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight RIders Captain) श्रेयस अय्यरवर कॅप्टनपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर श्रेयसनं गेल्यावर्षीच्या आयपीएलमधील कॅप्टनपद गमावण्याबाबत जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. दुखापत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने कॅप्टनपदावरून बाजूला केल्याचं दु:ख मोठं होतं अशा शब्दांत श्रेयसने खंत व्यक्त केली आहे. हे वाचा-IPL 2022 सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकार एवढ्या प्रेक्षकांना देणार परवानगी? श्रेयस अय्यरने एका मुलाखतीत ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'आयपीएलपूर्वी दुखापत होणं हा माझ्यासाठी सर्वांत मोठा धक्का होता. तसं झालं नसतं तर मला कॅप्टनपद मिळालं असतं,'असं त्यानं म्हटलं आहे. श्रेयस अय्यरला आयपीएल 2021 दरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे तो सुरुवातीला खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सने त्याला कॅप्टनपदावरून हटवून ऋषभ पंतकडे ती जबाबदारी सोपवली. दिल्ली कॅपिटल्सने 2021 मध्ये जी कामगिरी केली ती 2019-20 च्या सीझनचा परिणाम होता. सर्व प्लेयर्स एकमेकांना ओळखत होते, कोणाची काय बलस्थाने आहेत, कोणाची काय कमजोरी आहे, याची प्रत्येकाला माहिती होती. त्यामुळे खेळताना त्याचा फायदा त्यांना झाला, असं श्रेयसनं स्पष्ट केलं. आयपीएल 2021 दरम्यान दुखापत झाल्यानं श्रेयस अय्यरच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला कॅप्टन केलं. कोरोना साथीमुळे आयपीएल स्पर्धेत खंड पडला. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल सुरू झाल्यावर श्रेयस खेळला पण दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतलाच कॅप्टन ठेवलं. यंदा दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरला टीममधून मोकळं केलं. श्रेयसला लखनऊ किंवा अहमदाबाद या टीम कॅप्टन म्हणून घेतील अशी एक शक्यता व्यक्त केली जात होती. पण श्रेयसने लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरसाठी 12.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतलं आणि आता त्याच्याकडे कॅप्टनपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर खूश झाला आहे. जे होतं ते चांगल्यासाठी, आपल्याला काही गोष्टींचे परिणाम नंतर दिसतात, अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली आहे. हे वाचा-IPL सुरू होण्याआधीच हार्दिकला मोठा धक्का, ज्याच्यावर विश्वास दाखवला त्यानेच... 'दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन असताना मी चांगल्या रन्स करत होतो, पण नंतर दुखापत झाली आणि सगळं चित्रच बदललं. दुखापतीमुळे माझी कामगिरी ढेपाळलीच. मात्र जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आता मी नव्याने खेळायला सज्ज झालो आहे,' असं त्यानं म्हटलं आहे. श्रेयस अय्यरनं न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टेस्ट मॅच सीरिजद्वारे भारतीय टेस्ट मॅच संघातून आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरीही केली. श्रीलंकेविरुद्ध नुकत्या झालेल्या टी-20 सीरिजमध्ये तिन्ही मॅचेसमध्ये श्रेयसने हाफ सेंच्युरी केल्या. प्लेयर ऑफ द सीरिजसाठी त्याची निवड करण्यात आली होती. सातत्यानं चांगली कामगिरी करून सर्वाचे लक्ष वेधून घेणारा श्रेयस अय्यर आता कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅप्टन पदावरून कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
First published:

Tags: Delhi capitals, Ipl, IPL 2021, Ipl 2022, Rishabh pant, Shreyas iyer

पुढील बातम्या