मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

स्टेडियममधून IPL 2022 सामने पाहायचे आहेत? महाराष्ट्र सरकार एवढ्या प्रेक्षकांना परवानगी देण्याची शक्यता

स्टेडियममधून IPL 2022 सामने पाहायचे आहेत? महाराष्ट्र सरकार एवढ्या प्रेक्षकांना परवानगी देण्याची शक्यता

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (MHCA) स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकसंख्येला बोलावण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (MHCA) स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकसंख्येला बोलावण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (MHCA) स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकसंख्येला बोलावण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मुंबई, 01 फेब्रुवारी: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) क्रिकेट स्पर्धेचा नवीन सीझन सुरू होण्यास एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. काही फ्रँचायझींनी (IPL Franchises) तर यापूर्वीच प्रॅक्टिस कॅम्प्सला सुरुवात केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या सीझनमध्ये एकूण 70 मॅचेस होणार आहेत. कोविड-19 (COVID-19) प्रसाराचा धोका आणि एअर ट्रॅव्हलिंग टाळण्यासाठी सर्व मॅचेस मुंबई (IPL Matches in Mumbai) आणि पुण्यातील (IPL Matches in Pune) एकूण चार स्टेडियममध्ये खेळवल्या जाणार आहेत. मुंबईत 55 आणि पुण्यात 15 मॅचेस होतील. दरम्यान, आयपीएल फ्रँचायझी आणि चाहत्यांसाठी एक सकारात्मक बाब समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (MHCA) स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकसंख्येला बोलावण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार(Cricbuzz), महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रविवारी (27 फेब्रुवारी 22) एमसीए अधिकाऱ्यांची भेट घेतली. आयपीएल आयोजनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आणि 25 टक्के प्रेक्षकसंख्येला परवानगी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

हे वाचा-IPL 2022 : पंजाब किंग्जचा कॅप्टन ठरला, 'या' खेळाडूच्या नावावर शिक्कामोर्तब

अलीकडेच, धर्मशाला (Dharamsala) येथे झालेल्या तिसऱ्या भारत-श्रीलंका टी-20 क्रिकेट मॅचसाठी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशननं (Himachal Pradesh Cricket Association) 10 हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांना परवानगी दिली होती. त्यामुळे, बीसीसीआय (BCCI) हा ट्रेंड पुढे सुरू ठेवेल आणि आयपीएलदरम्यान प्रेक्षकांचं स्वागत करेल, अशी आशा आहे.

'होय, आता ते वर्तुळ पूर्ण झालं आहे, पुन्हा क्रिकेट प्रेक्षकांसह सुरू झालं आहे,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे कोषाध्यक्ष (Treasurer) अरुणसिंग धुमल (Arun Singh Dhumal) यांनी क्रिकबझला दिली. श्रीलंकेविरुद्धच्या टी- 20 क्रिकेट सीरिजच्या शेवटी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हे वाचा-IPL 2022 च्या 9 टीमनी केली कॅप्टनची घोषणा, 10वी टीम अजूनही नावाच्या शोधात!

'2020मध्ये धर्मशालापासूनच इंडियन क्रिकेटमध्ये कोविडचा शिरकाव झाला होता. त्यामुळे खेळ थांबला होता. कोविडच्या धोक्यामुळे त्यानंतर लखनौ आणि कोलकाता येथील मॅचेसही रद्द करण्यात आल्या होत्या. आता धर्मशालापासूनच प्रेक्षकांना पुन्हा स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मिळाली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. क्रिकेटसाठी प्रेक्षकांमध्ये असलेला उत्साह पाहून खूप आनंद झाला. मला आशा आहे की यापुढे पुन्हा कधी इंडियन क्रिकेटमध्ये खंड पडणार नाही,' असंही धुमल म्हणाले.

टीम इंडियाची पुढील मॅच 3 मार्चपासून मोहालीत सुरू होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमधील ही पहिली मॅच आहे. ही मॅच विराट कोहलीची (Virat Kohli) 100वी टेस्टदेखील आहे. परंतु, फॉर्मर कॅप्टन पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर प्रेक्षकांच्यासमोर खेळू शकणार नाही. मात्र, बंगळुरूमधील (Bangalore) दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) प्रेक्षकांना परवानगी मिळाली आहे. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशननं (KSCA) दुजोरा दिला आहे की, 50 टक्के प्रेक्षकसंख्या स्टेडियममध्ये येऊ शकते. त्यामुळे 13 ते 17 मार्चदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या टेस्टसाठी साधारण 15 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हे वाचा-IPL 2022 : वडील CEO, सासरे DGP, करोडपती आहे टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू!

या सर्व स्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकारनं जर आयपीएलसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी दिली, तर जवळपास दोन वर्षानंतर स्टेडियम्समध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण दिसेल.

First published:

Tags: Ipl 2022