मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : आयपीएल सुरू होण्याआधीच हार्दिकला मोठा धक्का, ज्याच्यावर विश्वास दाखवला त्यानेच दिला 'धोका'

IPL 2022 : आयपीएल सुरू होण्याआधीच हार्दिकला मोठा धक्का, ज्याच्यावर विश्वास दाखवला त्यानेच दिला 'धोका'

आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या मोसमात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स या दोन टीम पहिल्यांदाच खेळणार आहेत, पण त्याआधीच गुजरातच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 मार्च : आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या मोसमात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स या दोन टीम पहिल्यांदाच खेळणार आहेत, पण त्याआधीच गुजरातच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा आक्रमक ओपनर जेसन रॉय (Jason Roy) याने आयपीएलच्या या मोसमातून माघार घेतली आहे. गुजरातने रॉयला लिलावात 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार रॉयने मागच्याच आठवड्यात गुजरातच्या फ्रॅन्चायजीला आपण आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं. यानंतर टीमने अजूनपर्यंत रॉयला पर्याय म्हणून कोणत्याच खेळाडूबाबत निर्णय घेतलेला नाही. बायो-बबलमध्ये एवढा काळ राहणं आव्हानात्मक असल्याचं कारण देत रॉयने माघार घेतल्याचं सांगितंलं आहे. गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टीमचं कर्णधार केलं आहे.

31 वर्षांच्या जेसन रॉयने बायो-बबलमध्ये झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) धमाकेदार कामगिरी केली होती. रॉय क्वेट्टा ग्लॅडिएटर्सचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. पीएसएलच्या 6 टीममध्ये क्वेट्टाची टीम पाचव्या क्रमांकावर राहिली. रॉयने 6 सामन्यांमध्ये 50.50 च्या सरासरीने 303 रन केले, यात 2 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे.

दुसऱ्यांदा आयपीएलमधून माघार

आयपीएल लिलावात विकला गेल्यानंतर जेसन रॉयने दुसऱ्यांदा माघार घेतली आहे. याआधी 2020 साली रॉयला दिल्ली कॅपिटल्सने 1.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण वैयक्तिक कारणांमुळे त्याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. रॉय यंदा खेळला असता तर गुजरात टायटन्स त्याची चौथी आयपीएल टीम असती.

याआधी तो गुजरात लायन्स, दिल्ल डेयरडेव्हिल्स आणि सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. 2021 च्या लिलावात रॉय अनसोल्ड राहिला, पण ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्शला दुखापत झाल्यामुळे हैदराबादने त्याला टीममध्ये घेतलं. रॉयने 13 आयपीएल सामन्यांमध्ये 329 रन केले आहेत, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. यातलं एक अर्धशतक त्याने दिल्लीकडून तर दुसरं हैदराबादकडून केलं आहे.

First published:

Tags: Ipl 2022