मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023: CA ची तयारी करता करता झाला क्रिकेटर, KKR चा हा खेळाडू आयपीएलमध्ये करणार कमाल

IPL 2023: CA ची तयारी करता करता झाला क्रिकेटर, KKR चा हा खेळाडू आयपीएलमध्ये करणार कमाल

CA ची तयारी करता करता झाला क्रिकेटर, KKR चा हा खेळाडू आयपीएलमध्ये करणार कमाल

CA ची तयारी करता करता झाला क्रिकेटर, KKR चा हा खेळाडू आयपीएलमध्ये करणार कमाल

आयपीएल 2023 ला ३१ मार्च पासून सुरुवात होणार आहे. यात कधीकाळी सीए परीक्षेसाठी तयारी करणारा केकेआर संघाचा क्रिकेटर आयपीएलच्या नव्या सीजनमध्ये आपल्या फलंदाजीची कमाल दाखवण्यासाठी सज्ज झालेला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च : आयपीएल 2023 ला आता लवकरच सुरुवात होणार आहे.  31 मार्च रोजी चेन्नई सुपरकिंग्स आणि गतविजेता गुजरात जाएंट्स या संघांमध्ये आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना खेळवला जाणार असून यावर्षी देखील क्रीडा रसिकांना रोमांचक सामने पाहायला मिळतील. यंदाच्या आयपीएलमध्ये भारतीय संघातील स्टार खेळाडू व्यंकटेश अय्यर स्पर्धेत आपल्या फलंदाजीची कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहे.  यंदा देखील व्यंकटेश अय्यर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजी करताना दिसणार असून केकेआरने व्यंकटेशला यावर्षी 8 कोटी देऊन रिटेन केले आहे.

व्यंकटेश अय्यर हा भारतीय क्रिकेटमधील उभरता तारा असून त्याने अअल्पावधित आपल्या दमदार खेळीने लोकांच्या मनावर ठसा उमटवला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये केलेल्या शानदार कामगिरीमुळे व्यंकटेश अय्यरचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला होता. व्यंकटेश अय्यर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी मध्य प्रदेशातील अष्टपैलू क्रिकेटपटू होता. त्याचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला त्याने आपले बीकॉम पर्यंत आपले शिक्षण केले असून त्यानंतर तो काही काळ सीएची तयारी देखील करीत होता.  पण नंतर क्रिकेटच्या प्रेमापोटी त्याने शिक्षण सोडले.

व्यंकटेश अय्यरने 17 नोव्हेंबर 2021 रोजी सवाई मानसिंग स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 20 सप्टेंबर 2021 रोजी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने आरसीबीविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याने 27 चेंडूत 41 धावा केल्या होत्या.

Virat Kohli : 18 नंबरची जर्सी का घालतो विराट? स्वतः विराट कोहलीने सांगितलं यामागचं कारण

व्यंकटेशचे वडील राजशेखरन यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाच्या यशात त्याच्या आईचा मोठा वाटा आहे. ती नेहमी व्यंकटेशला प्रेरणा देत असे. दुसरीकडे व्यंकटेशची आई उषाराज शेखरा यांनी सांगितले की, व्यंकटेशला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती, तो लहान असताना प्लास्टिकच्या बॅटने खेळायचा.

पुढे त्या म्हणालया, "आम्ही ज्या वातावरणातून आलो त्या वातावरणात नोकरीला प्राधान्य दिले जाते, पण व्यंकटेशची क्रिकेटमधील आवड पाहून मी त्याला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला, नंतर व्यंकटेश सर्वांच्या अपेक्षांवर खरा उतरला." व्यंकटेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी त्यांना खूप काही शिकवले, त्यामुळे व्यंकटेशच्या यशात त्यांचा मोठा हात असल्याचे त्यांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: IPL 2023, KKR, Team india