मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » Virat Kohli : 18 नंबरची जर्सी का घालतो विराट? स्वतः विराट कोहलीने सांगितलं यामागचं कारण

Virat Kohli : 18 नंबरची जर्सी का घालतो विराट? स्वतः विराट कोहलीने सांगितलं यामागचं कारण

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. सध्या विराट कोहली चांगल्या फॉर्मात असून त्याची हीच दमदार खेळी आगामी आयपीएलमध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विराटचे चाहते त्याच्या जीवनाशी निगडित विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. विराट नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर 18 नंबरची जर्सी घालून उतरतो. तेव्हा विराट नेहमी 18 नंबरचीचं जर्सी का घालतो असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतो. तेव्हा विराट कोहलीने एका कार्यक्रमात स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India