मुंबई, 3 मे : आयपीएल 2023 मधील 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबईने पंजाबचा पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला असून हा मुंबईचा सलग दुसरा विजय आहे. मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये पाच सामने जिंकले आहेत. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. यात सुरुवातीला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मुंबईने पंजाब किंग्सच्या 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेऊन त्यांना 214 रन्सवर रोखले. पंजाब किंग्सकडून शिखर धवनने 30, लिव्हिंग स्टोनने 82 तर जितेश शर्माने 49 रन्स केले. मुंबईच्या गोलंदाजांपैकी पीयूष चावलाने 2 तर अर्शद खानने 1 विकेट घेतली. IPL 2023 MI vs PBKS : ‘हिटमॅन बनला डकमॅन’ शुन्यावर बाद होऊन नावावर केला नकोसा विक्रम मुंबई इंडियन्सला विजयासाठी 215 धावांचे आव्हान मिळाले असताना मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी मैदानात उतरली. परंतु यावेळी मुंबईच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर शुन्य धाव करून बाद झाला. परंतु उप कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनने मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी 100 हुन अधिक धावांची पार्टनरशिप करून संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. मुंबई इंडियन्सकडून ईशान किशनने 75, सूर्यकुमार यादवने 66, कॅमरन ग्रीनने 23 , तिलक वर्माने २६ तर टीम डेविडने १९ धावा केल्या. अखेर मुंबईने विजयासाठीच आव्हान पूर्ण करत पंजाब किंग्सचा हिशोब चुकता केला. यापूर्वी पंजाब किंग्सने मुंबईचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मुंबईने विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.