जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 MI vs PBKS : 'हिटमॅन बनला डकमॅन' शुन्यावर बाद होऊन नावावर केला नकोसा विक्रम

IPL 2023 MI vs PBKS : 'हिटमॅन बनला डकमॅन' शुन्यावर बाद होऊन नावावर केला नकोसा विक्रम

'हिटमॅन बनला डकमॅन' शुन्यावर बाद होऊन नावावर केला नकोसा विक्रम

'हिटमॅन बनला डकमॅन' शुन्यावर बाद होऊन नावावर केला नकोसा विक्रम

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फलंदाजीत खराब प्रदर्शन करून शुन्य धावांवर बाद झाला. या खेळीमुळे त्याच्या नावावर आयपीएलमध्ये नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 मे : आयपीएल 2023 मधील 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फलंदाजीत खराब प्रदर्शन करून शुन्य धावांवर बाद झाला. या खेळीमुळे त्याच्या नावावर आयपीएलमध्ये नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. यात सुरुवातीला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मुंबईने पंजाब किंग्सच्या 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेऊन त्यांना 214 धावांवर रोखले. त्यानंतर विजयासाठी तब्बल 215 धावांचे आव्हान मिळाले असताना मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी मैदानात उतरली. परंतु यावेळी मुंबईच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही.

News18

कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर शुन्य धावा करून बाद झाला. पंजाबचा गोलंदाज रिषी धवनने टाकलेल्या चेंडूवर शॉट मारताना रोहित कॅच आउट झाला त्यामुळे शुन्य धावांवर मुंबई इंडियन्सची एक विकेट पडली. या सामन्यात रोहित शर्माने डक आउट होऊन आपल्या नावावर नकोस विक्रम नोंदवला. रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 15 वेळा शुन्यावर बाद होणार फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक वेळा डक आउट होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माच्या नावाची देखील नोंद झाली आहे. IPL 2023 : गौतम गंभीर सोबतच्या वादानंतर विराट अनुष्का पोहोचले देव दर्शनाला Video Viral रोहित शर्मा सह आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा डक आउट होण्याचा विक्रम दिनेश कार्तिक आणि मंदीप सिंह  यांच्या नावावर आहे. हे दोघे देखील तब्बल 15 वेळा आयपीएलमध्ये डक आउट झाले होते. या विक्रमामुळे रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात