मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : गुजरातविरुद्ध धोनीचं मराठी कार्ड, महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना संधी

IPL 2023 : गुजरातविरुद्ध धोनीचं मराठी कार्ड, महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना संधी

आयपीएल 2023 ला सुरूवात, पहिलाच सामना गुजरात विरुद्ध चेन्नई

आयपीएल 2023 ला सुरूवात, पहिलाच सामना गुजरात विरुद्ध चेन्नई

IPL 2023 आयपीएल 2023 च्या सिझनला सुरूवात झाली आहे. पहिलाच सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadabad, India

अहमदाबाद, 31 मार्च : आयपीएल 2023 च्या सिझनला सुरूवात झाली आहे. पहिलाच सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. गुजरातविरुद्धच्या या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना संधी दिली आहे, तर आणखी दोन खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून असणार आहेत.

धोनीने चेन्नईच्या टीममध्ये ऋतुराज गायकवाड आणि राजवर्धन हंगर्गेकर यांना संधी दिली आहे. ऋतुराज आणि हंगर्गेकर महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतात. याशिवाय सीएसकेने अजिंक्य रहाणे आणि तुषार देशपांडे या दोन मुंबईच्या खेळाडूंना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ठेवलं आहे.

रोहितने शेवटच्या क्षणी बाहेर काढलं ट्रम्पकार्ड, बुमराहची रिप्लेसमेंट आहे तरी कोण?

गुजरातची टीम

ऋद्धीमान सहा, शुभमन गिल, केन विलियमसन, हार्दिक पांड्या, विजय शंकर, राहुल तेवातिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, यश दयाळ, अल्झारी जोसेफ

इम्पॅक्ट प्लेअर : साई सुदर्शन, जयंत यादव, मोहित शर्मा, अभिनव मनोहर, केएस भरत

चेन्नईची टीम

डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, राजवर्धन हंगर्गेकर

इम्पॅक्ट प्लेअर : तुषार देशपांडे, शुभांशू सेनापती, शेख रशीद, अजिंक्य रहाणे, निशांत सिद्धू

काय आहे इम्पॅक्ट प्लेअरचा नियम?

- आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच इम्पॅक्ट प्लेयरचा नियम वापरण्यात येणार आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा हा नियम गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

- इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमानुसार टॉसवेळी प्रत्येक कर्णधाराला त्याच्या प्लेयिंग इलेव्हनसह चार पर्यायी खेळाडूंची नावंही सांगावी लागणार आहेत. कर्णधार मॅचच्या वेळी कधीही इम्पॅक्ट प्लेयरला मैदानात आणू शकतो. टॉसवेळी सांगितलेल्या 4 खेळाडूंपैकी एकाच खेळाडूचा कर्णधाराला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर करण्यात येणार आहे. हा इम्पॅक्ट खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमधल्या खेळाडूच्या बदली खेळेल.

- बदली होऊन पॅव्हेलियनमध्ये गेलेला खेळाडू मॅचमध्ये पुन्हा खेळू शकणार नाही. तसंच बारावा खेळाडू म्हणूनही मैदानात फिल्डिंगला येऊ शकणार नाही.

- इम्पॅक्ट प्लेयर मॅचमध्ये कॅप्टन्सी करू शकणार नाही.

- इम्पॅक्ट प्लेयर रिटायर हर्ट झालेल्या खेळाडूच्या जागी बॅटिंगला येऊ शकतो.

- दोन्ही टीम प्रत्येक मॅचमध्ये एकदाच इम्पॅक्ट प्लेयरचा वापर करू शकते.

- जर टीममध्ये 4 परदेशी खेळाडू खेळत असतील तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्यांना चौथा परदेशी खेळाडू वापरता येणार नाही.

आर्चरचे तोफगोळे रोहितलाही झेपले नाहीत, तुफानी बॉलिंगचा Video

First published:
top videos

    Tags: CSK, Gujarat Titans, IPL 2023