मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : आर्चरचे तोफगोळे रोहितलाही झेपले नाहीत, तुफानी बॉलिंगचा Video

IPL 2023 : आर्चरचे तोफगोळे रोहितलाही झेपले नाहीत, तुफानी बॉलिंगचा Video

जोफ्रा आर्चरची भेदक बॉलिंग, रोहितचा संघर्ष

जोफ्रा आर्चरची भेदक बॉलिंग, रोहितचा संघर्ष

आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्सची टीम सज्ज झाली आहे. मुंबईने जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. जोफ्राच्या भेदक बॉलिंगसमोर रोहित शर्माही संघर्ष करताना दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च : आयपीएल 2023 च्या सिझनला सुरूवात झाली आहे. पहिलाच सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. आयपीएलच्या नव्या मोसमासाठी प्रत्येक टीमनेच सरावाला सुरूवात केली आहे. आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबईसाठी मागचा मोसम निराशाजनक होता. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती. ही कामगिरी सुधारण्यासाठी रोहितची टीम मैदानात उतरणार आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी 2 एप्रिलला आरसीबीविरुद्ध आहे. बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होईल. त्याआधी मुंबईने सरावाला सुरूवात केली आहे. मुंबई इंडियन्सच्या सरावाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर कर्णधार रोहित शर्माला बॉलिंग टाकताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये जोफ्रा आर्चर रोहित शर्माला तीन बॉल टाकताना दिसत आहे. आर्चरने टाकलेल्या या तीनही बॉलमध्ये रोहित शर्मा संघर्ष करताना पाहायला मिळत आहे.

रोहितने शेवटच्या क्षणी बाहेर काढलं ट्रम्पकार्ड, बुमराहची रिप्लेसमेंट आहे तरी कोण?

आयपीएल 2022 च्या लिलावात मुंबईने जोफ्रा आर्चरला विकत घेतलं होतं, पण दुखापतीमुळे आर्चर खेळू शकला नव्हता. या मोसमात मात्र आर्चर खेळण्यासाठी सज्ज आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत जोफ्रा आर्चरवर जास्त जबाबदारी असणार आहे.

सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची मागच्या दोन मोसमातली कामगिरी निराशाजनक झाली. तसंच मोसमाची सुरूवात मुंबईसाठी फार चांगली होत नाही, हा इतिहास आहे. यावर्षी मात्र मुंबई हा इतिहास बदलण्यासाठी मैदानात उतरेल.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, पियुष चावला, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, संदीप वॉरियर, अर्जुन तेंडुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, नेहल वढेरा, राघव गोयल, आकाश मधवाल, ऋतीक शौकीन, जेसन बेहरनडॉर्फ, ड्युआन जॉनसन, विष्णू विनोद, शम्स मुलानी

आयपीएलचं थ्रील आणखी वाढणार, नवे नियम ठरणार गेम चेंजर!

First published:
top videos

    Tags: IPL 2023, Mumbai Indians