मुंबई, 23 एप्रिल : मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) सर्वाधिक 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माची (Rohit Sharma) कामगिरी यंदाच्या मोसमात (IPL 2022) निराशाजनक झाली आहे. फक्त बॅटिंगमध्येच नाही तर नेतृत्वामध्येही रोहित अपयशी ठरत आहे. या हंगामात मुंबईने पहिल्या सातही मॅच गमावल्या आहेत, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं अशक्य झालं आहे. मुंबईच्या या खराब कामगिरीनंतर अनेक जण रोहितला कर्णधारपद सोडण्याचाही सल्ला देत आहेत. रोहितने जर कॅप्टन्सी सोडली तर मुंबईकडे कॅप्टन्सीसाठी 3 पर्याय उपलब्ध आहेत.
कायरन पोलार्ड
वेस्ट इंडिजच्या या दिग्गज खेळाडूने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तसंच त्याने आयपीएल आणि जगभरातल्या इतर टी-20 लीग खेळण्याचेही संकेत दिले आहेत. पोलार्डकडे (Kieron Pollard) वेस्ट इंडिजच्या टीमचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे, तसंच तो बराच काळ मुंबई इंडियन्ससोबत आहे, त्यामुळे तो मुंबईचा पुढचा कर्णधार होऊ शकतो, असं असलं तरी पोलार्डला या मोसमात बॅटने धमाकेदार कामगिरी करता आलेली नाही.
सूर्यकुमार यादव
मुंबई इंडियन्स वारंवार मॅच गमावत असली तरी सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. आपल्याला रिटेन करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सूर्यकुमार यादवने सिद्ध केलं. रोहितनंतर सूर्यकुमारला मुंबई इंडियन्सचं नेतृत्व दिलं तर तो बराच काळ ही भूमिका निभावू शकतो.
जसप्रीत बुमराह
मुंबईचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. मुंबईची कामगिरी खराब सुरू असली तरी बुमराह चांगली बॉलिंग करत आहे. तो टीम इंडियाचा उपकर्णधारही होता, त्यामुळे तो भविष्यात मुंबईचा कर्णधार होऊ शकतो. बुमराहकडे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा बराच अनुभव आहे, याचा फायदा मुंबई इंडियन्सना होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Jasprit bumrah, Kieron pollard, Mumbai Indians, Rohit sharma, Suryakumar yadav