जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जॉनी बेअरस्टोने मिळवलं IPL मधील दिग्गज फलंदाजांच्या रांगेत स्थान! कामगिरी तर वाचा

जॉनी बेअरस्टोने मिळवलं IPL मधील दिग्गज फलंदाजांच्या रांगेत स्थान! कामगिरी तर वाचा

जॉनी बेअरस्टोने मिळवलं IPL मधील दिग्गज फलंदाजांच्या रांगेत स्थान! कामगिरी तर वाचा

IPL 2022, PBKS vs RR Live Updates: आयपीएल 2022 मध्ये शनिवारी डबल हेडर खेळला जात आहे. दिवसाचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. यात पंजाबकडून खेळताना जॉनी बेअरस्टो मोठ्या यशाला गवसणी घातली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मे : आयपीएल (Indian Premier League 2022) हंगामातील 52 वा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टोच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 5 गडी गमावून 189 धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवले. आजच्या सामन्यात जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) केलेल्या कामगिरीमुळे आयपीएलमधील दिग्गजांच्या रांगेत त्याला स्थान मिळालं आहे. जॉनी बेअरस्टो पूर्वीच्या रुपात परतला राजस्थानविरुद्ध सलामीवीर म्हणून खेळायला आलेल्या जॉनी बेअरस्टोच्या बॅटमधून मोसमातील पहिले अर्धशतक झळकले. त्याने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात (PBKS vs RR) जॉनी बेअरस्टो 40 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 56 धावा करून चहलचा बळी ठरला. यासोबतच त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावाही पूर्ण केल्या. परिणामी आयपीएलमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत आता जॉनी बेअरस्टो बसणार आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही रोहित टेन्शनमध्ये, सर्वात मोठा मॅच विनर होणार Out सर्वात वेगवान 4000 हजार धावा करणारे खेळाडू युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल आयपीएलमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. 2019 च्या आयपीएल हंगामात सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना गेलने ही कामगिरी केली. त्याने 112 डावात 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 114 डावात आपल्या चार हजार धावा पूर्ण केल्या होत्या. गेलशिवाय कोहलीने 128 डावांत, सुरेश रैना आणि गौतम गंभीरने 140-140 डावांत 4000 धावा पूर्ण केल्या होत्या. ‘वेग हेच सर्वस्व नाही, मेंदूही वापरावा लागतो’… विश्वविजेत्या गोलंदाजाने उमरान मलिकचे टोचले कान पंजाबसाठी ही स्पर्धा महत्त्वाची पंजाबसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण त्यांच्याकडे आता फक्त 10 गुण आहेत. 10 पैकी पाच सामने गमावलेल्या पंजाब फ्रँचायझीला आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सलग सामने जिंकावे लागणार आहेत. पंजाबने उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकले, तर पुढील टॉप-4साठी लढणे त्यांच्यासाठी थोडे सोपे होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात