Home /News /sport /

'वेग हेच सर्वस्व नाही, मेंदूही वापरावा लागतो'... विश्वविजेत्या गोलंदाजाने उमरान मलिकचे टोचले कान

'वेग हेच सर्वस्व नाही, मेंदूही वापरावा लागतो'... विश्वविजेत्या गोलंदाजाने उमरान मलिकचे टोचले कान

सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran malik) आयपीएल 2022 मध्ये सातत्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे. पण गेल्या दोन सामन्यांत तो चांगलाच महागात पडला. अशा स्थितीत 2007 टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळालेला वेगवान गोलंदाज आरपी सिंगने (RP Singh) त्याच्यासाठी मोठी गोष्ट सांगितली आहे. आरपी सिंग म्हणाला की, गती ही सर्वस्व नसते. गोलंदाज असल्याने त्याला मन लावून धोरण आखावे लागते की कोणत्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी कशी करायची?

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 7 मे : सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran malik) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आपल्या वेगानं सर्वांना चकित करत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता, जो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू आहे. मात्र, या सामन्यात उमरान चांगलाच महागात पडला आणि त्याने 4 षटकात 52 धावा दिल्या. म्हणजेच त्याच्या प्रत्येक षटकात 13 धावा आल्या. 2007 टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य असलेल्या आरपी सिंगने (RP Singh) याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध उमरान मलिकचा 52 धावांचा स्पेल हा गोलंदाजासाठी एक प्रकारचा रिअॅलिटी चेक होता, असे आरपी सिंगचे मत आहे. उमरानची आयपीएल कारकीर्द केवळ 13 सामन्यांची आहे. पण, एवढ्या छोट्या कारकिर्दीतही त्याने 150 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकण्याच्या त्याच्या क्षमतेने सर्वांना प्रभावित केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने 9 सामन्यांत 8.44 च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट घेतल्या होत्या. गोलंदाज म्हणून त्याची क्षमता दाखवण्यासाठी हे पुरेसे आहे. पण दिल्लीविरुद्ध 52 आणि त्याआधी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 4 षटकांत 48 धावांनी उमरानवर प्रश्न उपस्थित केले आहेत. IPL 2022: RCB प्लास्टिकच्या बाटल्यांची जर्सी घालून मैदानात उतरणार! 2011 पासूनची परंपरा; हे आहे कारण उमरानला वेगासोबत विकेट्स घ्याव्या लागतील : आरपी सिंग आरपी सिंगने क्रिकबझशी संवाद साधताना सांगितले की, “गेल्या दोन सामन्यांमधील उमरानची कामगिरी पाहता, तो अजूनही त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे कळते. त्याला लांबच्या शर्यतीचा घोडा व्हायचं असेल तर वेगासोबतच विकेट्सही काढायला हव्यात. त्याने फक्त वेगवान गोलंदाजीवर अवलंबून राहू नये. 'वेग हे सर्वस्व नाही तर मेंदूही वापरावा लागेल' आरपी सिंग पुढे म्हणाले, “उमरान अजून मोठ्या मंचावर खेळला नाही आणि अजून पूर्णपणे तयार नाही. आयपीएल 2022 मध्ये पॉवरप्लेमध्ये त्याचा वापर करण्यात आला, जिथे खूप धावा झाल्या आणि शेवटच्या षटकातही फलंदाजांनी त्याच्या वेगाचा वापर करून खूप धावा कुटल्या. वेग हे सर्व काही नाही, वेगवान गोलंदाजी करणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचवेळी तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करून हे जाणून घेतले पाहिजे की कोणत्या फलंदाजाविरुद्ध कुठे गोलंदाजी करायची? आणि हे कौशल्य फक्त अनुभवातून येईल. फक्त 2-3 सामने खेळून चालणार नाही. उमरान योग्य मार्गावर आहे हे खरे आहे. पण, त्याच्यासाठी हे दोन सामने म्हणजे रिअ‍ॅलिटी चेक सारखे आहेत. जर दिशा आणि लांबीत थोडी चूक झाली तर धावा निघणारच." शेवटच्या सामन्यात उमरानचा खेळ सनरायझर्स हैदराबादला भारी पडला आणि त्यांना 208 धावांचे मोठे लक्ष्य गाठावे लागले आणि त्याचा परिणाम सर्वांना माहीत आहे की हैदराबादने तो सामना 21 धावांनी गमावला.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Ipl 2022, Sunrisers hyderabad

    पुढील बातम्या