मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही रोहित टेन्शनमध्ये, सर्वात मोठा मॅच विनर होणार Out

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही रोहित टेन्शनमध्ये, सर्वात मोठा मॅच विनर होणार Out

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग आठ पराभवानंतर सूर गवसला आहे. मुंबईनं या सिझनमध्ये सलग दोन विजय मिळवले आहेत. या विजयानंतरही कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन कायम आहे.

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग आठ पराभवानंतर सूर गवसला आहे. मुंबईनं या सिझनमध्ये सलग दोन विजय मिळवले आहेत. या विजयानंतरही कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन कायम आहे.

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग आठ पराभवानंतर सूर गवसला आहे. मुंबईनं या सिझनमध्ये सलग दोन विजय मिळवले आहेत. या विजयानंतरही कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन कायम आहे.

मुंबई, 7 मे : मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग आठ पराभवानंतर सूर गवसला आहे. शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबईनं या सिझनमधील नंबर 1 टीम गुजरात टायटन्सचा 5 रननं पराभव केला. या मॅचमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशननं (Ishan Kishna) चांगली सुरूवात केली. जसप्रीत बुमराह आणि डॅनियल सॅम्सनंही शेवटच्या ओव्हर्स चांगल्या टाकल्या. मुंबईचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. या विजयानंतरही कॅप्टन रोहितचं टेन्शन कायम आहे.

मुंबई इंडियन्सचा अनुभवी खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) गुजरात विरूद्धच्या मॅचमध्येही अपयशी ठरला. पोलार्डनं 14 बॉलमध्ये फक्त 4 रन काढले. राशिद खाननं त्याला आऊट केलं. पोलार्ड गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याची बॅट शांत होती. आता आयपीएलमध्येही तो अपयशी ठरतोय.

मुंबई इंडियन्सचा मुख्य फिनिशर असलेल्या पोलार्डनं या सिझनमधील 10 इनिंगमध्ये 14.33 च्या सरासरीनं 129 रन केले असून 25 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 109.32 पर्यंत घसरला आहे. सततच्या अपयशामुळे पोलार्डच्या प्लेईंग 11 मधील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

IPL 2022, PBKS vs RR Dream 11 Team Prediction : 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

पोलार्डचा पर्याय उपलब्ध

पोलार्डसाठी आणखी एक अडचणीची बाब म्हणजे टीम डेव्हिड हा त्याला भक्कम पर्याय मुंबईकडे तयार आहे. डेव्हिडनं गुजरात विरूद्ध 21 बॉलमध्ये नाबाद 44 रन केले होते. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स विरूद्धही त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत टीमच्या विजयात योगदान दिले होते. दक्षिण आफ्रिकेचा तरूण क्रिकेटपटू डेवाल्ड ब्रेविसनं त्याला मिळालेल्या संधीमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. पोलार्डमुळे त्याला प्लेईंग 11 मधून बाहेर बसावं लागलं आहे. त्यामुळे आता कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सोमवारी होणाऱ्या मॅचमध्ये अनुभवी पोलार्ड आणि तरूण ब्रेविस यामध्ये कुणाची निवड करायची याचा निर्णय रोहितला घ्यावा लागणार आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians, Rohit sharma