मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : धोनी, कोहली, शर्मा कायम; हार्दिकचा पत्ता कट; पाहा खेळाडूंची यादी

IPL 2022 : धोनी, कोहली, शर्मा कायम; हार्दिकचा पत्ता कट; पाहा खेळाडूंची यादी

List of retained IPL players

List of retained IPL players

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठीचे लिलाव (IPL 2022 auction) सुरू होण्यास आता काहीच दिवस उरले आहेत. त्यापूर्वी सर्व टीम्सना आपल्या खेळाडूंपैकी काही खेळाडू कायम ठेवता (IPL 2022 retained players) येणार आहेत, तर काहींना सोडावं (IPL 2022 released players) लागणार आहे. या वर्षी प्रत्येक टीमला आपले 4-4 खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसंच, यासाठी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतची (IPL team retain list) मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता समोर आलेल्या याद्या या बऱ्यापैकी फायनल समजल्या जात आहेत.

'क्रिकइन्फो'ने दिलेल्या माहितीनुसार, एम. एस. धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), सुनील नरिने, आंद्रे रसेल, ग्लेन मॅक्सवेल अशा काही तगड्या खेळाडूंना आपापल्या टीम्सनी कायम ठेवलं आहे. टीमबाहेर ठेवलेल्यांमध्येही काही मोठी नावं आहेत. हार्दिक पंड्या (Hardik Pandya), डेव्हिड वॉर्नर (David Warner), के. एल. राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर, इयॉन मॉर्गन अशा मोठ्या खेळाडूंना त्यांच्या टीम्सनी बाहेर ठेवलं आहे. अर्थात, ही यादी फायनल नसून, आज दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम यादी (IPL 2022 retained players final list) जमा करण्याचे निर्देश प्रत्येक टीमला देण्यात आले आहेत.

सध्या हाती आलेल्या माहितीनुसार प्रत्येक टीमने पुढीलप्रमाणे आपले खेळाडू कायम ठेवले आहेत :

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) : एम. एस. धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) : सुनील नरिने, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) : केन विल्यमसन

मुंबई इंडियन्स (MI) : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल.

दिल्ली कॅपिटल्स (DC) : ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिच नॉर्किया.

राजस्थान रॉयल्स (RR) : संजू सॅमसन

पंड्या ब्रदर्स खेळणार अहमदाबाद टीमकडून?

दरम्यान, हार्दिक आणि कृणाल पंड्या हे दोघे यंदाच्या आयपीएलमध्ये नव्याने येणाऱ्या अहमदाबाद टीमकडून खेळण्याची शक्यता आहे. या दोघांनीही मागील आयपीएलमध्ये खराब प्रदर्शन केले होते. हार्दिक तर अजूनही चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे मुंबई हार्दिकला बाहेर ठेवणार याबाबत अनेक क्रिकेट एक्सपर्ट्सना खात्री होती. क्रिकबझने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, पंड्या बंधू अहमदाबाद फ्रँचायझीकडून खेळू शकतात.

First published:

Tags: Hardik pandya, IPL 2020, Ipl 2022 auction, MS Dhoni, Rohit sharma, Virat kohli