जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'KKR मध्ये कुलदीप सेफ नव्हता', टीम इंडियाच्या खेळाडूचा पहिल्याच मॅचनंतर मोठा दावा

IPL 2022 : 'KKR मध्ये कुलदीप सेफ नव्हता', टीम इंडियाच्या खेळाडूचा पहिल्याच मॅचनंतर मोठा दावा

IPL 2022 : 'KKR मध्ये कुलदीप सेफ नव्हता', टीम इंडियाच्या खेळाडूचा पहिल्याच मॅचनंतर मोठा दावा

दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्याच मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Delhi Capitals vs Mumbai Indians) पराभव करत स्पर्धेची दमदार सुरूवात केली आहे. दिल्लीकडून कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) 3 विकेट्स घेत या विजयात मोलाचे योगदान दिले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 मार्च : दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्याच मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Delhi Capitals vs Mumbai Indians) पराभव करत स्पर्धेची दमदार सुरूवात केली आहे. दिल्लीकडून कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) 3 विकेट्स घेत या विजयात मोलाचे योगदान दिले. कुलदीची मागील काही आयपीएल सिझनमध्ये निराशाजनक कामगिरी झाली होती. दिल्लीकडून पहिलीच मॅच खेळताना त्यानं महत्त्वाच्या विकेट्स घेत दमदार कामगिरी केली. कुलदीपच्या या कामगिरीवर टीम इंडियाचा खेळाडू आणि दिल्लीचा ऑल राऊंडर अक्षर पटेलनं (Axar Patel) मोठा दावा केला आहे. ‘KKR मध्ये सेफ नव्हता’ कुलदीपच्या कामगिरीबद्दल मॅचनंतर पत्रकारांशी बोलताना अक्षर म्हणाला की, ‘हा सर्व मानसिकतेचा प्रश्न आहे. तो आयपीएलमध्ये संघर्ष करत होता कारण त्याची केकेआरमधील जागा सुरक्षित नव्हती. त्याला सर्व मॅच खेळण्याची खात्री नव्हती. आता त्याला इथं तशी खात्री वाटत आहे. तुमची जागा सुरक्षित आहे, दोन मॅचमधील खराब कामगिरीनंतरही टीममधून वगळलं जाणार नाही, याची खात्री असेल तर तुम्ही सर्वश्रेष्ठ योगदान देता,’ असे मत अक्षरनं व्यक्त केले. केकेआरकडून साधारण कामगिरी करणाऱ्या कुलदीपनं मिडल ओव्हर्समध्ये रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डच्या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीवर अक्षर म्हणाला,  ‘कोच रिकी पॉन्टिंग आणि कॅप्टन ऋषभनं (पंत) त्याला पाठिंबा दिला. त्यामुळेच तो सर्वोत्तम कामगिरी करू शकला. प्रॅक्टीसच्या वेळीच आम्ही त्याच्यामध्ये तू चांगलं करू शकतोस, असा विश्वास निर्माण केला. त्यामुळे त्याच्या मानसिकतेमध्ये फरक पडला. तो आता सर्व मॅच खेळणार आहे.’ IPL 2022 : पंजाब विरूद्ध RCB चा खेळाडू बनला ख्रिस्तियानो रोनाल्डो, Video Viral कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन मुंबईच्या 3 विकेट घेतल्या. त्याच्या स्पेलमुळे मुंबईला मोठा स्कोर करता आला नाही. कुलदीप यादवच्या नावावर 46 आयपीएल सामन्यांमध्ये 43 विकेट आहेत. याशिवाय त्याने 66 वनडेमध्ये 109 विकेट आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 41 विकेट घेतल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात