मुंबई, 28 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) ही आयपीएलमधील रविवारची मॅच चांगलीच रंगतदार झाली. या मॅचमध्ये 200 पेक्षा जास्त रन केल्यानंतरही आरसीबीचा पराभव झाला. आरसीबनं पहिल्यांदा बॅटींग करत 205 रन केले होते. पंजाबनं एक ओव्हर बाकी असतानाच टार्गेट पूर्ण केले. आरसीबीच्या या पराभवानंतरही त्यांचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यानं केलेलं सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. सिराजनं पंजाब विरूद्ध 2 विकेट्स घेतल्या. पण, तो चांगलाच महागडा ठरला. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 17.5 च्या इकोनॉमी रेटनं 59 रन दिले. या महागड्या स्पेलमुळे सिराज सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याचवेळी त्याचं पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) पद्धतीचं सेलिब्रेशनही व्हायरल झालं आहे.
सिराजनं 14 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. सिराजनं पहिल्यांदा धोकादायक बनलेल्या भानुका राजपक्षेला आऊट केलं. त्यानंतर पुढच्या बॉलवर अंडर 19 वर्ल्ड कपमधील स्टार राज बावाची विकेट घेतली. या दोन विकेटनंतर त्यानं Siu सेलिब्रेशन केले. फुटबॉल विश्वात रोनाल्डो या सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो. सिराजच्या या 2 विकेट्सनं आरसीबीनं मॅचमध्ये कमबॅक केले होते. पण, त्यानंतरही त्यांना विजय मिळवता आला नाही. IPL 2022 : एकाच ओव्हरमधील 2 चुका पडल्या महाग, 5 बॉलमध्ये निसटला RCB चा विजय मोहम्मद सिराजची 18 वी ओव्हर बँगलोरला चांगलीच महाग पडली. ओडियन स्मिथनं (Odean Smith) त्या ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि 1 फोर लगावत पंजाबला विजयाच्या अगदी जवळ नेले. स्मिथने 8 बॉलमध्ये नाबाद 25 तर शाहरुख खानने (Shahrukh Khan) 20 बॉलमध्ये नाबाद 24 रन केले. भानुका राजपक्षाने 22 बॉलमध्ये 43, शिखर धवनने (Shikhar Dhawan) 29 बॉलमध्ये 43, मयंक अग्रवालने 24 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली. तर लियाम लिव्हिंगस्टोन 10 बॉलमध्ये 19 रन करून आऊट झाला. आरसीबीकडून मोहम्मद सिराजला 2 विकेट मिळाल्या, तर आकाश दीप, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.