मुंबई, 28 फेब्रुवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) साठी पंजाब किंग्जचा कॅप्टन (Punjab Kings) निश्चित झाला आहे. पंजाबचा मागील सिझनमधील कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) यंदा लखनऊ सुपर जायंट्स टीमचा कॅप्टन आहे. त्यामुळे त्याच्या रिक्त जागेवर राहुलचा मित्र मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) नियुक्ती केली आहे. आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) पंजाबनं शिखर धवनला (Shikhar Dhawan) खरेदी केलं आहे. त्याच्या नावाचीही कॅप्टन म्हणून चर्चा होती.
मयंकची मागील दोन आयपीएल सिझनमध्ये जोरदार कामगिरी झाली आहे. त्याने आयपीएल 2021 मधील 12 मॅचमध्ये 441 तर आयपीएल 2020 मधील 11 मॅचमध्ये 424 रन केले होते. या कामगिरीमुळेच मयंकला आगामी सिझनसाठी पंजाबनं रिटेन केले होते. पंजाबने सोमवारी ट्विट करत त्याच्या नावाची घोषणा केली.
Attention #SherSquad
Our © ➜ Mayank Agarwal Send in your wishes for the new #CaptainPunjab #SaddaPunjab #PunjabKings #TATAIPL2022 @mayankcricket pic.twitter.com/hkxwzRyOVA — Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 28, 2022
आयपीएल ऑक्शनमध्ये पंजाबनं शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो तसंच लियाम लिविंगस्टोन या प्रमुख खेळाडूंना खरेदी केले आहे. मयंकची टी20 क्रिकेटमधील कामगिरी चांगली आहे. त्याने 159 इनिंगमध्ये 26 च्या सरासरीनं 3917 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 135 आहे. मयंक टीम इंडियाकडून आजवर 19 टेस्ट आणि 5 वन-डे खेळला आहे. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावलं आहे.
IPL टीमनी दुर्लक्ष केलेल्या खेळाडूची आणखी एक आक्रमक खेळी, 38 बॉलमध्ये काढले 74 रन
पंजाब किंग्जनं आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही. हा इतिहास बदलण्याचं मोठं आव्हान कॅप्टन मयंक आणि हेड कोच अनिल कुंबळेसमोर असेल. आगामी आयपीएल स्पर्धेसाठी कोलताता नाईट रायडर्सनं (KKR) श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) कॅप्टनपदी नियुक्ती केली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) कॅप्टनपदासाठी फाफ डू प्लेसिसचे (Faf du Plessis) नाव सर्वात आघाडीवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl 2022, Punjab kings