जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 च्या 9 टीमनी केली कॅप्टनची घोषणा, 10वी टीम अजूनही नावाच्या शोधात!

IPL 2022 च्या 9 टीमनी केली कॅप्टनची घोषणा, 10वी टीम अजूनही नावाच्या शोधात!

IPL 2022 च्या 9 टीमनी केली कॅप्टनची घोषणा, 10वी टीम अजूनही नावाच्या शोधात!

आयपीएलच्या 15व्या मोसमाला (IPL 2022) सुरूवात 26 मार्चपासून होणार आहे, तर 29 मे रोजी फायनल खेळवली जाईल. यंदाच्या वर्षापासून 8 ऐवजी 10 टीम स्पर्धेत सहभागी होणार आहेत, यातल्या 9 टीमच्या कर्णधारांची घोषणा झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी : आयपीएलच्या 15व्या मोसमाला (IPL 2022) सुरूवात 26 मार्चपासून होणार आहे, तर 29 मे रोजी फायनल खेळवली जाईल. यंदाच्या वर्षापासून 8 ऐवजी 10 टीम स्पर्धेत सहभागी होणार आहेत, यातल्या 9 टीमच्या कर्णधारांची घोषणा झाली आहे. सोमवारी पंजाब किंग्सने (Punjab Kings) मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) टीमचं कर्णधार केलं, पण अजूनही रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) त्यांचा कर्णधार जाहीर केलेला नाही. आयपीएलच्या या मोसमात फक्त एकच टीमचा कर्णधार परदेशी आहे. सनरायजर्स हैदराबादने केन विलियमसनला लिलावाच्या आधी रिटेन केलं होतं, त्यालाच टीमचं नेतृत्वही देण्यात आलं आहे. इतर 8 टीमचे खेळाडू टीम इंडियातले प्रमुख आहेत. आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व एमएस धोनीकडे आहे. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत, राजस्थानचा संजू सॅमसन आणि हैदराबादचा केन विलियमसन आहे. खेळाडूंच्या रिटेनशनवेळीच हा निर्णय झाला होता. लखनऊ सुपर जाएंट्सने लिलावाआधी केएल राहुलला विकत घेतलं आणि त्याच्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवली. तर गुजरात टायटन्सनेही हार्दिक पांड्याला विकत घेऊन त्याच्याकडे टीमचं नेतृत्व दिलं. कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात श्रेयस अय्यरला विकत घेतलं आणि त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं. आता पंजाबनेही त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. आता फक्त आरसीबी कर्णधार कोणाला करणार, याबाबत उत्सुकता आहे. विराट कोहलीने मागच्या मोसमानंतर टीमची कॅप्टन्सी सोडली. आरसीबीकडे विराटचा उत्तराधिकारी म्हणून फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोन पर्याय आहेत. आरसीबीने मॅक्सवेलला रिटेन केलं होतं, तर फाफ डुप्लेसिसला लिलावात विकत घेतलं होतं. IPL 2022 चे कर्णधार चेन्नई सुपर किंग्स - एमएस धोनी मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स - ऋषभ पंत कोलकाता नाइट राइडर्स - श्रेयस अय्यर राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन सनरायजर्स हैदराबाद - केन विलियमसन लखनऊ सुपर जाएंट्स - केएल राहुल गुजरात टायटन्स - हार्दिक पांड्या पंजाब किंग्स - मयंक अग्रवाल आरसीबी- घोषणा नाही

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ipl 2022
  • First Published :
जाहिरात
जाहिरात