मुंबई, 11 एप्रिल: कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) फिरकीपुढे केकेआरची (KKR vs Delhi Capitals) दाणादाण उडाली आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने कोलकात्याचा 44 रनने पराभव केला आहे. असे असले तरी क्रिकेट जगतामध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘मुंबई का शाणा’ या विधानाची. या मॅचपूर्वी दोन्ही संघाच्या क्रिकेटरमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. मॅचपूर्वी, कोलकाताचा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreys Iyer) आणि दिल्लीचा ऑलराउंडर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हे आपसात भिडले आहेत. या दोघांच्या शाब्दिक वादावादीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं काय लॉर्ड (शार्दुल) दिल्लीच्या गोटात तु चमकतोयस. असा खोचक प्रश्न श्रेयसने शार्दुलला विचारला. त्यावर, तु पण तर चमकतोयस. कोलकाताच्या जर्सीत तुझा चेहरा आणखी उजळलाय. असे उलट उत्तर शार्दुलने त्याला दिले. त्यानंतर मॅचपूर्वी, श्रेयसने आज एक छोटी झलक पाहायला तयार हो. तुला तर माहितीये माझा बेब्रोन स्टेडियममध्ये रेकॉर्ड कसा आहे ते. असे विधान करत आव्हान दिले. मुंबईकडून आहेस तर शाणा बनतोयस काय, माहितीये ना नेट्समध्ये तुला किती वेळा चकवा दिलाय. असे प्रत्युत्तर शार्दुलने श्रेयसच्या चॅलेंजवर दिले.
Friendly banter or sledging? We'll leave it to you to decide! 😁@ShreyasIyer15 @imShard #KKRHaiTaiyaar #KKRvDC #IPL2022 pic.twitter.com/z4xaNuO9kU
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 10, 2022
दिल्लीने शार्दुल ठाकूरला आयपीएलच्या 15 व्या मोसमातील मेगा लिलावात 10 कोटी 75 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. शार्दुल याआधी चेन्नईकडून खेळायचा. तर दुसऱ्या बाजूला कोलकाताने श्रेयस अय्यरला 12 कोटी 25 लाख रुपयात खरेदी केलं. याआधी श्रेयस दिल्लीकडून खेळायचा. श्रेयसने आपल्या नेतृत्वा दिल्लीला आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवलं होतं. अवघ्या 118 मॅचमध्ये ही कामगिरी करणारा Yuzvendra Chahal बनला दुसरा खेळाडू, या दिग्गजाचे तोडले रेकॉर्ड हा मॅचपूर्वीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चॅलेंज देणारा श्रेयस दिल्लीसमोर झुकला आहे. दिल्लीने दिलेल्या 216 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा 19.4 ओव्हरमध्ये 171 रनवर ऑल आऊट झाला. कुलदीप यादवने 4 ओव्हरमध्ये 35 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर खलील अहमदला 3, शार्दुल ठाकूरला 2 आणि ललित यादवला 1 विकेट घेण्यात यश आलं.

)







