जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सुरेश रैनासोबतची ती 5 मिनिटांची भेट ठरले Unforgettable, बदललं Tilak Varma चं आयुष्य

सुरेश रैनासोबतची ती 5 मिनिटांची भेट ठरले Unforgettable, बदललं Tilak Varma चं आयुष्य

Tilak Varma

Tilak Varma

पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इशान किशनने 81 धावांची दमदार खेळी साकारली असली तरी जोरदार चर्चा मात्र तिलक वर्माची (Tilak Varma) सुरु होती. तिलकने या सामन्यात जवळपास दीडशेच्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि आपल्यातील चमक पहिल्याच सामन्यात दाखवून दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 एप्रिल: पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इशान किशनने 81 धावांची दमदार खेळी साकारली असली तरी जोरदार चर्चा मात्र तिलक वर्माची (Tilak Varma) सुरु होती. तिलकने या सामन्यात जवळपास दीडशेच्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि आपल्यातील चमक पहिल्याच सामन्यात दाखवून दिली. या तिलकच्या या यशामागे मिस्टर आयपीएल म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाचा (Suresh Raina) हात आहे. रैनाशी झालेल्या भेटीचा उल्लेख तिलक वर्मा ने एका मुलाखतीदरम्यान केला. दोघांची भेट ही 2014 मध्ये झाली होती. त्या भेटीने त्यांचे नशीब कसे बदलले याचा खुलासा तिलकने यावेळी केला. होणारे भावी सासरे सुनिल शेट्टींसोबत ‘या’ गोष्टीवरुन उडतात खटके, खुद्द के एल राहुलनं केला खुलासा भेटीच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपर किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार होता. या दरम्यान सुरेश रैना 12 वर्षांच्या नंबुरी ठाकूर तिलक वर्माशी पाच मिनिटे बोलला. त्याच्यासोबत एक फोटो काढला. या भेटीचा तिलक वर्मावर खोलवर परिणाम झाला. आता 8 वर्षांनंतर 20 वर्षीय डावखुरा फलंदाज तिलक वर्माची फलंदाजी सुरेश रैनाच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आणेल. टिळक वर्मानेही रविचंद्रन अश्विनला रिव्हर्स स्वीप करत षटकार ठोकला. तो दिवस आठवून बायेश म्हणाले, ‘माझा एक मित्र स्थानिक मॅनेजर होता. मी त्याला सराव मंजूर करण्यास मदत केली आणि तिळकला माझ्यासोबत घेतले. मुंबई इंडियन्सच्या संघात समाविष्ट असलेल्या आपल्या शिष्याबद्दल हे प्रशिक्षक म्हणाले, ‘मला आठवते की सुरेश रैनाची फलंदाजी पाहून तिलक खूप प्रभावित झाला होता. त्याने एकदाही त्याच्यावरून नजर हटवली नाही आणि रैनाच्या प्रत्येक शॉटकडे पाहित राहिला. त्यानंतर आम्ही त्याच्यासोबत एक फोटो काढला आणि मला वाटते की सुरेश रैनासोबतची ‘विशेष भेट’ तिळकला क्रिकेटपटू व्हायचे ठरवण्यासाठी पुरेशी होती. छोटा पॅकेट बडा धमाका, IPL 2022 मध्ये Uncapped खेळाडूंचे पाहायला मिळतंय वर्चस्व मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला, पण तिलक वर्माने आपल्या 61 धावांच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनीही त्याचे कौतुक केले. तिलक वर्माचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. माझे स्वप्न साकार करण्यासाठी पालकांनी खूप त्याग केला असल्याचे एका मुलाखतीत त्याने सांगितले. मुंबई इंडियन्ससाठी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असलेल्या तिलक वर्मा या महत्त्वाकांक्षी स्पर्धेतून मिळणाऱ्या पैशाने तो आई-वडिलांसाठी घर खरेदी करणार आहे. फेब्रुवारीमध्ये बंगळुरूत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मेगा लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सने या प्रतिभावान युवा फलंदाजांला 1.7 कोटी रूपयांना खरेदी केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात