advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / छोटा पॅकेट बडा धमाका, IPL 2022 मध्ये Uncapped खेळाडूंचे पाहायला मिळतंय वर्चस्व

छोटा पॅकेट बडा धमाका, IPL 2022 मध्ये Uncapped खेळाडूंचे पाहायला मिळतंय वर्चस्व

आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये (IPL 2022) अनुभवी खेळाडूंपेक्षा अनकॅप्ड खेळाडूंची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळत आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या आयुष बडोनीपासून पंजाबच्या जितेश शर्मापर्यंत आपल्या खेळाने छाप पाडली आहे. संघांसाठी कमी पैशात विकत घेतलेले हे खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवताना दिसत आहेत.

01
आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये (IPL 2022)  अनुभवी खेळाडूंपेक्षा अनकॅप्ड खेळाडूंची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळत आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या आयुष बडोनीपासून पंजाबच्या जितेश शर्मापर्यंत आपल्या खेळाने छाप पाडली आहे. संघांसाठी कमी पैशात विकत घेतलेले हे खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, ज्या खेळाडूंवर संघांनी जास्त पैसे खर्च केले आहेत, त्यापैकी काही खेळाडू संघासाठी डोकेदुखी ठरत आहेत.

02
सध्या क्रिकेट वर्तुळात आयुष बदोनी (Ayush Badoni) या नावाची बरीच चर्चा आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या आयुष बदोनीला संघाने त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपये देऊन खरेदी केले. आयुषने दोन्ही सामन्यात लखनऊसाठी शानदार खेळ दाखवला. आयुषने लखनऊसाठी पहिल्या सामन्यात 54 आणि चेन्नईविरुद्ध 19 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. या लीगमध्ये त्याने आतापर्यंत 74 धावा केल्या आहेत.

03
मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या तिलक वर्माला (Tilak Varma) संघाने 1.70 कोटी रुपयांना विकत घेतले. 19 वर्षीय तिळक वर्माने या लीगमध्ये आतापर्यंत दोन डावात 83 धावा केल्या आहेत तिलकने  राजस्थानविरुद्ध 61 आणि दिल्लीविरुद्ध 22 धावा केल्या.

04
मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला(DC) विजय मिळवून देणाऱ्या ललित यादवला(Lalit Yadav) दिल्लीने अवघ्या 65 लाख रुपयांना विकत घेतले. अष्टपैलू ललित यादवने दिल्लीविरुद्ध 38 चेंडूत 48 धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला. त्याचवेळी त्याने गुजरातविरुद्धही 25 धावा केल्या होत्या. ललित यादवने दिल्लीकडून आतापर्यंत 73 धावा केल्या आहेत.

05
वेगवान खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिकला(Umran Malik) सनरायझर्स हैदराबादने 4कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. उमरान मलिकने लीगमध्ये आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला असून उमरानने 39 धावांत 2 विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामात सर्वांच्या नजरा उमरान मलिकवर नक्कीच आहेत. त्याच्या उत्कृष्ट खेळाची आणि वेगाची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरूच आहे.

06
चेन्नईविरुद्ध पदार्पण करणाऱ्या जितेश शर्माला(Jitesh Sharma) पंजाब किंग्जने केवळ 20 लाख रुपयांना विकत घेतले. जितेश शर्माने चेन्नईविरुद्ध 3 षटकार मारून आपल्या लीग कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. 28 वर्षीय जितेश शर्मा विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. चेन्नईविरुद्धचा त्याचा शानदार खेळ त्याला आगामी सामन्यांसाठी नक्कीच आत्मविश्वास देईल.

07
मेगा लिलावात 2 कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या वैभव अरोराने (Vaibhav Arora) चेन्नईविरुद्ध जितेश शर्मासोबत पदार्पणही केले. वैभव अरोराने चेन्नईविरुद्ध 4 षटकात 21 धावा देत 2 बळी घेतले. त्याने रॉबिन उथप्पा आणि मोईन अलीच्या विकेट्स घेत पंजाबला चेन्नईविरुद्ध मजबूत स्थितीत आणले. पंजाबने हा सामना 54 धावांनी जिंकला.

  • FIRST PUBLISHED :
  • आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये (IPL 2022)  अनुभवी खेळाडूंपेक्षा अनकॅप्ड खेळाडूंची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळत आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या आयुष बडोनीपासून पंजाबच्या जितेश शर्मापर्यंत आपल्या खेळाने छाप पाडली आहे. संघांसाठी कमी पैशात विकत घेतलेले हे खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, ज्या खेळाडूंवर संघांनी जास्त पैसे खर्च केले आहेत, त्यापैकी काही खेळाडू संघासाठी डोकेदुखी ठरत आहेत.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement