Home /News /sport /

IPL 2022 मध्ये दोन भावांच्या दोन कहाण्या, एक हिरो तर दुसरा झिरो!

IPL 2022 मध्ये दोन भावांच्या दोन कहाण्या, एक हिरो तर दुसरा झिरो!

Photo- IPL/Twitter

Photo- IPL/Twitter

आयपीएल 2022 आता (IPL 2022) शेवटच्या टप्प्यावर आली आहे. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) यांची कामगिरी उल्लेखनीय झाली. या दोन्ही टीम आयपीएल प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाल्या.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 मे : आयपीएल 2022 आता (IPL 2022) शेवटच्या टप्प्यावर आली आहे. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) यांची कामगिरी उल्लेखनीय झाली. या दोन्ही टीम आयपीएल प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाल्या. गुजरात टायटन्सने तर पहिल्या क्वालिफायरनमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. गुजरात टायटन्सच्या या उत्कृष्ट कामगिरीचं प्रमुख कारण ठरला तो त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya). एकीकडे हार्दिक पांड्याने गुजरातकडून खेळताना धमाका केला असला तरी लखनऊकडून खेळणारा त्याचा भाऊ अपयशी ठरला. आरसीबीविरुद्धच्या एलिमिनेटरच्या सामन्यात कृणाल पांड्याने (Krunal Pandya) 4 ओव्हरमध्ये 39 रन दिल्या आणि एक विकेट घेतली. आयपीएलच्या या मोसमात कृणालने 14 मॅचच्या 12 इनिंगमध्ये 10 विकेट घेतल्या, तर बॅटिंगमध्ये त्याने 22.88 ची सरासरी आणि 127.08 च्या स्ट्राईक रेटने 183 रन केल्या. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. हार्दिकने 14 मॅचमध्ये 45.30 ची सरासरी आणि 132.84 च्या स्ट्राईक रेटने 453 रन केले. याशिवाय हार्दिकने 14 मॅचच्या 9 इनिंगमध्ये 7.73 च्या इकोनॉमी रेटने 5 विकेटही घेतल्या. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या मागच्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सच्या प्रमुख खेळाडूंपैकी होते. पांड्या बंधूंमुळे मुंबई आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम ठरली, पण यावर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शनआधी मुंबईला या दोन्ही खेळाडूंना रिलीज करावं लागलं, ज्याचा फटका त्यांना बसला. या आयपीएलमध्ये मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली. मुंबईला 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकता आल्या आणि 10 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022, Krunal Pandya, Lucknow Super Giants

    पुढील बातम्या