Home /News /sport /

मुंबई-गुजरातच्या सामन्यात रणवीर सिंगच्या लूकची चर्चा! हिटमॅनच्या सिक्सवर अशी दिली Reaction की..

मुंबई-गुजरातच्या सामन्यात रणवीर सिंगच्या लूकची चर्चा! हिटमॅनच्या सिक्सवर अशी दिली Reaction की..

Ranveer Singh

Ranveer Singh

IPL 2022, GT vs MI Updates: आयपीएल 2022 च्या 51 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघ प्रथम फलंदाजी करेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 मे : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सनला (Mumbai Indians) या सिझनमध्ये अखेर सूर गवसला आहे. मुंबईनं यापूर्वीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव केला होता. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर आज (शुक्रवार) मुंबईची लढत गुजरात टायटन्सशी (Gujarat Titans) होत आहे. या सामन्यात मुंबईला पराभूत करून आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याची संधी गुजरातला आहे. तर मुंबई इंडियन्सनला आता सन्मानासाठी सामने जिंकावे लागणार आहेत. रोहित शर्मा आज चांगल्या फॉर्मात खेळाताना दिसत आहे. दरम्यान, बॉलिवूड स्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) आजच्या सामान्यात मुंबई इंडियन्सनचे मनोबल उंचावताना पहायला मिळाला. रणवीर सिंगच्या उपस्थितीने प्रेक्षक खूश मुंबई आणि गुजरात टायटन्सच्या सामन्यात आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगच्या उपस्थितीने प्रेक्षकांमधील उत्साह वाढला आहे. विशेषतः मुंबईच्या फॅन्सक्लबमध्ये जास्त जल्लोष पाहायला मिळत आहे. कारण, रोहितच्या फटकेबाजीला रणवीर दाद देताना दिसत आहे. हिटमॅनने मारलेल्या उत्तुंग षटकारानंतर रणवीरने उठून टाळ्या वाजवल्या. रणवीर सिंग बद्दल बोलायचं झालं तर तो त्याच्या नेहमीच्या अंदाजात दिसत आहे. फुलांची नक्षी असलेला जांभळ्या रंगाचा शर्ट आणि डोक्यावर गोल पांढऱ्या टोपी आहे. तर डोळ्यांना गॉगल, कानात डायमन्ड आणि गळ्यात मोत्याची माळ दिसत आहे. त्याच्या या हटके लूकचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईची प्रथम फलंदाजी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स संघ प्रथम फलंदाजी करत आहे. गुजरात टायटन्सला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी फक्त एकच सामना जिंकावा लागेल. मुंबईला हरवून प्लेऑफमध्ये पोहोचणारा सीझनचा पहिला संघ बनण्याचा प्रयत्न करेल. कगिसो रबाडाला आवडली नाही धवनची मस्करी, धू धू धूतलं, Video Viral हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कॅप्टन असलेल्या गुजरातनं या सिझनमध्ये 10 पैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यांना आता 'प्ले ऑफ' गाठण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. पंजाब किंग्ज विरूद्ध झालेल्या लढतीमध्ये गुजरातची बॅटींग फेल गेली होती. मुंबई विरूद्ध मॅच जिंकण्यासाठी शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या या गुजरातच्या प्रमुख बॅटर्सनी मोठा स्कोर करणे आवश्यक आहे. गुजरातच्या बॉलिंगची भिस्त मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन आणि राशिद खानवर आहे. यापैकी शमीची पंजाबच्या लियाम लिव्हिंगस्टोननं चांगलीच धुलाई केली होती. IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरला नव्हती शतकाची पर्वा, मॅचसहीत मनही जिंकलं! मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे त्यांना आता गमवण्यासारखं काहीच नाही. रोहित शर्मा मोठा स्कोर करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. मुंबईची सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा ही जोडी फॉर्मात आहे. आपल्या जुन्या टीमला पराभूत करण्यासाठी  हार्दिक पांड्या काय रणनीती आखतो हे या मॅचमध्ये स्पष्ट होईल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Gujarat Titans, Mumbai Indians, Ranveer singh

    पुढील बातम्या