मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरला नव्हती शतकाची पर्वा, मॅचसहीत मनही जिंकलं!

IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरला नव्हती शतकाची पर्वा, मॅचसहीत मनही जिंकलं!

फोटो - IPL

फोटो - IPL

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये 92 रनची नाबाद खेळी केली. वॉर्नरला या मॅचमध्ये शतकाची संधी होती.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 मे : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये 92 रनची नाबाद खेळी केली. वॉर्नरला या मॅचमध्ये शतकाची संधी होती. पण, त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये एकही बॉल खेळायला मिळाला नाही. वॉर्नरचा पार्टनर आणि वेस्ट इंडिजचा बॅटर रोव्हमन पॉवेलनं (Rovman Powell) उमरान मलिकची शेवटची संपूर्ण ओव्हर खेळून काढली. वॉर्नरचं शतक न झाल्यानं त्याचे फॅन्स हळहळले असले तरी वॉर्नरच्याच सल्ल्यानं पॉवेलनं शेवटची ओव्हर खेळून काढल्याचं उघड झालं आहे.

दिल्लीची इनिंग संपल्यानंतर पॉवेलनं याबाबतचा खुलासा केला आहे. पॉवेल यावेळी म्हणाला की, 'मी एक रन काढतो त्यानंतर तू शतक पूर्ण कर असं वॉर्नरला शेवटच्या ओव्हरपूर्वी सांगितलं होतं. त्यावेळी वॉर्नरनं मला असं क्रिकेट खेळत नाहीत. तू तुला शक्य आहे तितकी आक्रमक बॅटींग करण्याचा प्रयत्न कर, असा सल्ला दिला.' वॉर्नरच्या या निस्वार्थी सल्ल्यानं त्याचं शतक हुकलं पण, दिल्लीला महत्त्वाचा विजय मिळाला.

पॉवेलनं उमरान मलिकच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 19 रन काढले. त्याच्या या फटकेबाजीमुळेच दिल्लीनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 आऊट 207 रनचा टप्पा गाठला. हैदराबादला 208 रनचं आव्हान पेलवलं नाही. त्यांनी 8 आऊट 186 रन केले. दिल्लीनं हैदराबादवर 21 ऱननं विजय मिळवला. या विजयात पॉवेलनं शेवटच्या ओव्हरमध्ये काढलेले 19 रन निर्णायक ठरले. वॉर्नरनं दिलेल्या सल्ल्यामुळेच पॉवेलला ही फटकेबाजी करता आली.

Mumbai Indians ना धक्का, फास्ट बॉलर आयपीएलमधून आऊट, दक्षिण आफ्रिकन खेळाडूची एण्ट्री

या विजयासोबत दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. दिल्लीने 10 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे हैदराबाद सहाव्या क्रमांकावर आहे, त्यांनीही 10 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत आणि 5 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे.

First published:

Tags: David warner, Delhi capitals, Ipl 2022, SRH