Home /News /sport /

कगिसो रबाडाला आवडली नाही धवनची मस्करी, धू धू धूतलं, Video Viral

कगिसो रबाडाला आवडली नाही धवनची मस्करी, धू धू धूतलं, Video Viral

शिखर धवनची कगिसो रबाडासोबत रील तयार करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील धवननं कॅप्टन मयंक अग्रवाल आणि रबाडासोबत एक रील तयार केलं होतं.

  नवी दिल्ली, 6 मे : सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) या टी-20 क्रिकेट टूर्नामेंटचा 15वा सिझन सुरू आहे. लीग स्टेज (League Stage) आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये (Point Table) पुढे जाण्यासाठी विविध टीममध्ये चढाओढ दिसत आहे. आपली पहिलीच टूर्नामेंट खेळणाऱ्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन टीमनी धडाकेबाज कामगिरी करत पॉईंट्स टेबलमध्ये वर्चस्व ठेवलं आहे. तर मुंबई इंडियन्स (MI), चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यासारख्या भरवशाच्या टीम पॉईंट टेबलच्या तळाशी दिसत आहेत. याशिवाय, पंजाब किंग्जलादेखील (Punjab Kings) चांगली कामगिरी करता आलेली नाही. पंजाबची टीम सातव्या क्रमांकावर आहे. या टीमनं आतापर्यंत 10 मॅचेस खेळल्या असून त्यापैकी पाच जिंकल्या आहेत तर पाच गमावल्या आहेत. पंजाबचे खेळाडू 'ऑन फील्ड' फारशी चांगली कामगिरी करू शकले नसले तरी 'ऑफ फील्ड' ते कायम चर्चेत असतात. चर्चेत असलेल्या खेळाडूंमध्ये प्रामुख्यानं शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि कगिसो रबाडा (Kagiso Rabada) यांचा समावेश होतो. हे दोन्ही खेळाडू आता एका इन्स्टाग्राम रीलमुळे (Instagram Reel) पुन्हा चर्चेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये रबाडा शिखर धवनला लाथांनी मारताना दिसत आहे. क्रिक ट्रॅकर वेबसाईटनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरला नव्हती शतकाची पर्वा, मॅचसहीत मनही जिंकलं! सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा बॅट्समन शिखर धवन आणि फास्ट बॉलर कगिसो रबाडा या जोडगोळीची दमदार कामगिरी सुरू आहे. टीममधील इतर खेळाडूंना सूर गवसत नसताना हे दोन्ही खेळाडू सातत्यानं दमदार खेळ करत आहेत. हे दोन्ही खेळाडूंना प्रचंड धिंगाणा घालण्याची सवय आहे. ड्रेसिंग रुममध्ये (Dressing Room) दोघेजण सतत काहीनाकाही कुरापती करताना दिसतात. यापैकी, शिखर धवनला इन्स्टाग्राम रील्स पोस्ट करण्याची किती आवड आहे, याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. तो सतत रील्स पोस्ट करत असतो. त्याचे रील्स इतके मजेशीर (Funny) असतात की ते तत्काळ व्हायरलदेखील होतात. सध्या तो पंजाब किंग्ज टीममधील आपल्या सहकाऱ्यांसोबत रील्स तयार करून पोस्ट करत आहे. फास्ट बॉलर कगिसो रबाडा आता त्याचा रील पार्टनर (Reel Partner) झाला आहे. या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला असून तो खूप व्हायरल होत आहे.
  सध्या व्हायरल होत असलेल्या रीलमध्ये शिखर धवन हातात फुटबॉल (Football) घेऊन पायऱ्यांच्या रेलिंगवरून (Railing) खाली घसरत येताना दिसत आहे. जेव्हा धवन रेलिंगवरून खाली येतो तेव्हा रबाडा त्याच्या पायात पाय अडकवून त्याला खाली पाडतो आणि त्याला फुटबॉलप्रमाणं किक करण्यास सुरुवात करतो. रबाडा अशा प्रकारे धवनची 'धुलाई' करत असताना टीममधील इतर खेळाडू त्यांची गंमत बघताना दिसत आहेत. ‘ओम फो धर्राटे काट रही है’ हे बॅकग्राउंड साँग टाकून शिखर धवननं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे रील पोस्ट केलं आहे. त्याला 'बेइज्जती करा दी' असं कॅप्शनदेखील दिलं आहे. हे रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.
  शिखर धवनची कगिसो रबाडासोबत रील तयार करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील धवननं कॅप्टन मयंक अग्रवाल आणि रबाडासोबत एक रील तयार केलं होतं.
  First published:

  Tags: Instagram post, Punjab kings, Shikhar dhawan

  पुढील बातम्या