जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : भावानेच भावाचा घात केला, कृणालच्या सापळ्यात असा अडकला हार्दिक, VIDEO

IPL 2022 : भावानेच भावाचा घात केला, कृणालच्या सापळ्यात असा अडकला हार्दिक, VIDEO

Photo- Disney+HotStar

Photo- Disney+HotStar

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदा वेगवेगळ्या टीमकडून खेळत आहेत. हार्दिक गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार आहे, तर कृणाल लखनऊ सुपर जाएंट्सच्या (Lucknow Super Giants) टीममध्ये आहे. यंदाच्या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात कृणालने हार्दिकची विकेट घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 मार्च : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) हे दोघं भाऊ मागच्या मोसमापर्यंत आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळले. मुंबईला सगळ्यात यशस्वी टीम करण्यात दोन्ही पांड्या बंधूंचा मोलाचा वाटा होता, पण आयपीएलच्या मेगा ऑक्शनमुळे मुंबईला हार्दिक आणि कृणालला रिलीज करावं लागलं, यानंतर हार्दिक गुजरातच्या टीममध्ये (Gujarat Titans) तर कृणाल पांड्या लखनऊच्या (Lucknow Super Giants) टीममध्ये गेला. यानंतर पहिल्यांदाच हार्दिक आणि कृणाल एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरले. कृणाल पांड्याने या सामन्यात हार्दिक पांड्याची विकेट घेतली. कृणालने रचलेल्या सापळ्यामध्ये हार्दिक अडकला आणि स्वत:ची विकेट गमावून बसला. कृणालने फ्लाईट दिलेल्या बॉलवर हार्दिक मोठा शॉट मारायला गेला, पण बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या मनिष पांडेने कॅच पकडला. हार्दिक पांड्या 28 बॉलमध्ये 33 रन करून आऊट झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिकने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीच्या भेदक बॉलिंगपुढे लखनऊला 20 ओव्हरमध्ये 158/6 पर्यंत मजल मारता आली. दीपक हुड्डा आणि आयुष बदोणीने अर्धशतकं केली. कृणाल पांड्याने 13 बॉलमध्ये नाबाद 21 रनची खेळी केली. लखनऊ आणि गुजरात यांच्यातल्या या सामन्यात टीम इंडियाला पडलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचंही उत्तर मिळालं. ऑलराऊंडर असलेल्या हार्दिक पांड्याने मॅचमध्ये पूर्ण 4 ओव्हर बॉलिंग केली आणि 37 रन दिले. हार्दिकला विकेट मिळाली नसली तरी टीम इंडियासाठी मात्र ही दिलासादायक गोष्ट आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिकने बॉलिंग केली नव्हती. फिटनेसची समस्या असतानाही हार्दिकला टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आलं. स्पर्धेतल्या टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं खापर हार्दिकवर फुटलं. टी-20 वर्ल्ड कपनंतर हार्दिकने क्रिकेटमधून ब्रेक घेतला, यानंतर पहिल्यांदाच तो खेळण्यासाठी मैदानात उतरला. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्याआधी हार्दिकला बॉलिंग करताना पाहून टीम इंडिया आणि कर्णधार रोहित शर्माला नक्कीच दिलासा मिळाला असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात