मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /दोन वर्षांच्या बंदीनंतर IPLमध्ये कमबॅक केलेला KKRचा ‘हा’ बॉलर संपूर्ण हंगामातून बाहेर

दोन वर्षांच्या बंदीनंतर IPLमध्ये कमबॅक केलेला KKRचा ‘हा’ बॉलर संपूर्ण हंगामातून बाहेर

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात लढत होत आहे. तत्पूर्वी केकेआर संघासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात लढत होत आहे. तत्पूर्वी केकेआर संघासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात लढत होत आहे. तत्पूर्वी केकेआर संघासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मुंबई, 15 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात लढत होत आहे. तत्पूर्वी केकेआर संघासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन वर्षाच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये कमबॅक केलेला वेगवान गोलंदाज रसिक सलाम दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर याबद्दल माहिती दिली आहे.

कोलकाताकडून यंदाच्या सीझनमध्ये 2 सामने खेळणारा 22 वर्षीय वेगवान गोलंदाज सलाम हा त्याच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाल्यामुळे संपूर्ण सीझनमधून बाहेर झाला आहे. त्याच्याजागी आता कोलकाताने हर्षित राणा याला संधी दिली आहे. दिल्लीकर हर्षितला कोलकाता संघाने 20 लाखांच्या मूळ किंमतीला विकत घेतले आहे.

दोन वर्षांच्या बंदीनंतर IPLमध्ये केले होते कमबॅक

त्याने 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केले होते. परंतु त्याला त्या हंगामात केवळ एक सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्या हंगामात वय फसवणूकीच्या आरोपामुळे बीसीसीआयने सलामवर आयपीएलमधून 2 वर्षांची बंदी घातली होती. तो त्यावेळी 19 वर्षांचा होता, परंतु त्याने स्वतला 17 वर्षांचे सांगितले होते.

हे ही वाचा-कोण आहे Abhinav Manohar? वडील चालवायचे चपलांचे दुकान, गुजरात टायटन्सने बनवले करोडपती

त्यानंतर चालू हंगामातून त्याने आयपीएलमध्ये पुनमरागमन केले होते. परंतु केवळ 2  सामने खेळल्यानंतर त्याला संपूर्ण हंगामातून बाहेर पडावे लागले आहे. सलामने आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ 3 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला एकही विकेट घेता आलेली नाही.

तसेच दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांच्याबाबतही मोठे अपडेट आले आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळली आहे.

रसिक सलामपूर्ली चेन्नईचा दीपक चाहरला दुखापतीमुळे आयपीएलच्या सामन्यांना मुकावे लागले.  दुखापतीमुळे तो या हंगामातील एकही सामना खेळू शकला नव्हता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो त्याच्या दुखापतीवर काम करत होता. परंतु यादरम्यान त्याच्या पाठीचे जुने दुखणे वर आल्यानंतर तो संपूर्ण हंगामात अनुपलब्ध असेल.

First published:
top videos

    Tags: Chennai, Csk, Ipl 2022, KKR