मुंबई, 14 एप्रिल: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज 24 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) आमनेसामने आहेत. गुजरातने राजस्थानला 193 धावांचे आव्हान दिले आहे. इतकी मोठी धावसंख्या उभारण्यात गुजरातचा नवखा क्रिकेटर अभिनव मनोहर (Abhinav Manohar) याचेही मोलाचे योगदान आहे. त्याने कॅप्टन हार्दिक पांड्याच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 86 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याच्या या फटकेबाजीमुळे क्रिकेट जगतात सध्या अभिनवच्या नावाची चर्चा रंगली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध अभिनवची शानदार खेळी अभिनव मनोहरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 28 चेंडूत 43 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याने कर्णधार हार्दिक पांड्यासोबत मोठी भागीदारी केली. अभिनव मनोहर चांगली फलंदाजी करत होता, पण त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही आणि युझवेंद्र चहलने त्याला बाद केले. कोण आहे अभिनव मनोहर? अभिनव कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. अभिनव, 27, उजव्या हाताने फलंदाजी तसेच गोलंदाजी लेग ब्रेक. अभिनवने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021-22 मधील कामगिरीने प्रभावित केले. त्याला बाद फेरीत कर्नाटकने संधी दिली आणि त्याचे त्याने चांगलेच भांडवल केले. अभिनवने प्री-क्वार्टर फायनलमध्ये सौराष्ट्रविरुद्ध पदार्पण केले आणि 49 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत नऊ चेंडूत 19, उपांत्य फेरीत 13 चेंडूत 27 आणि अंतिम फेरीत 37 चेंडूत 46 धावा केल्या. लिलावात 13 पटींपेक्षा जास्त किंमतीला गुजरातने घेतले विकत देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शन पाहता गुजरातला या खेळाडूला विकत घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली. आयपीएल 2022 साठी त्याने राजस्थान रॉयल्सकडून ट्रायल दिले होते. मेगा लिलावात तो 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह उतरला होता. त्याला विकत घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रस्सीखेच झाली होती. अखेर गुजरातने मूळ किंमतीच्या 13 पटीने जास्त म्हणजे 2 कोटी 60 लाखांना त्याला विकत घेतले आहे. हार्दिक पांड्यासारखीच स्फोटक शैली अभिनव कर्नाटकातील बंगलोरचा आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नुकत्याच झालेल्या हंगामात या 27 वर्षीय क्रिकेटपटूने पदार्पण केले आहे. तो अजूनही त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. अभिनव हा उजव्या हाताचा फलंदाज आणि लेग ब्रेक स्पिनर आहे, तो त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. अनेक लोक त्याची तुलना स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यासोबत करतात. त्याची खेळण्याची शैली हार्दिक पांड्यासारखीच स्फोटक आहे. यामुळेच तो आयपीएलसाठी चांगला खेळाडू मानला जातो. वडील फुटवेअरचे दुकान चालवायचे अभिनव मनोहर अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहे. अभिनवचे वडील बंगळुरूमध्ये फुटवेअरचे दुकान चालवत होते, ज्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. अभिनवला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. अनेक अडचणींवर मात करत त्याने क्रिकेटची आवड जोपासली. अभिनव मनोहर 27 वर्षांचा आहे. तो मूळचा बंगलोर, कर्नाटकचा आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेत त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.