नवी दिल्ली, 01 एप्रिल: सध्या आयपीएल टी-20 क्रिकेट 2022 (IPL 2022) चा रणसंग्राम सुरू आहे. आयपीएलचा हा सीझन काही विशेष गोष्टींमुळे सातत्यानं चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) गुरुवारी (31 मार्च 22) मॅच झाली. ही मॅच (CSK vs LSG) उत्कंठावर्धक ठरली. या मॅचमध्ये दोन्ही टीम्सनं दमदार खेळी केली. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊनं 6 विकेट्स राखून चेन्नईवर विजय मिळवला. परंतु, या मॅचची जितकी चर्चा झाली, त्यापेक्षा अधिक चर्चा मॅचनंतर घडलेल्या एका प्रसंगाची होती.
सीएसकेचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि लखनऊ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांचे संबंध फारसे चांगले नसल्याच्या अफवा नेहमीच मीडियामध्ये पसरत असतात. खरं तर हे दोघंही दिग्गज क्रिकेटर आहेत. पण त्यांच्यात मतभेद असल्याची चर्चा असल्याने त्यांच्यातील संबंध खरंच चांगले नाहीत का, असा प्रश्न या दोघांच्याही फॅन्सच्या मनात असतो. पण गुरुवारच्या मॅचनंतर घडलेल्या एका प्रसंगामुळे या अफवा आणि चर्चांवर काहीसा पडदा पडला आहे.
हे वाचा-IPL 2022 : 15 सिझनमध्ये CSK वर पहिल्यांदाच ओढावली नामुश्की, जडेजानं सांगितलं पराभवाचं कारण
क्रिकेट जगतात महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर हे प्रतिभाशाली क्रिकेटर्स मानले जातात. पण, या दोघांमधील संबंध काहीसे खास नसल्याची चर्चा अनेकदा होते. गुरुवारी चेन्नई आणि लखनऊच्या मॅचनंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे या चर्चेला आणि यासंबंधी प्रश्नाला काहीअंशी पूर्णविराम मिळाला आहे. चेन्नई आणि लखनऊ यांच्यातील मॅच संपल्यावर सीएसकेचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि लखनऊ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर हे दोघं एकमेकांशी बोलताना दिसले. यामुळे त्यांच्या फॅन्सने आनंद व्यक्त केला आहे. चाहत्यांनी वर्ल्ड कपच्या आठवणी ताज्या झाल्याचं म्हटलं आहे.
Made my #morning Seeing these two legends together after so many years. All those worldCup memories hit hard#Dhoni #GautamGambhir #MSDhoni #ChennaiSuperKings #CSKvsLSG #CSK #CricketTwitter pic.twitter.com/qAJPUFLl84
— Kushagra Barjatya (@KushagraBarjat1) April 1, 2022
व्हायरल झालेल्या व्हिडीओंपैकी एका व्हिडीओत धोनी लखनऊ टीमच्या बॉलर्सना सल्ला देत असताना, तिथं गौतम गंभीर आला आणि तो धोनीशी संवाद साधू लागल्याचं दिसत आहे. या प्रसंगावरून धोनी किंवा गंभीर या दोघांनाही एकमेकांविषयी कोणतीही अडचण नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, या दोघांच्या चाहत्यांनी या व्हिडिओतील दृश्य पाहून समाधान व्यक्त केलं आहे.
Dhoni and Gambhir ♥️. A pure nostalgic moment.Tight slap to the media.#ipl @IPL#tataipl #gautamgambhir #LSGvsCSK #LSGvsCSK #CSKvLSG #CSK #LSK @LucknowIPL @ChennaiIPL pic.twitter.com/IESX347lIY
— Ravi gupta (@NotSoBaniya) March 31, 2022
सीएसकेनं गुरुवारी झालेली मॅच गमावली आहे. या स्पर्धेत सलग दोन मॅचेसमध्ये सीएसकेला पराभव पत्करावा लागला आहे. या आयपीएल सिझनमध्ये सीएसकेने केकेआर विरुद्ध पहिली मॅच खेळली. मात्र त्यात सीएसके टीम पराभूत झाली. त्यानंतर ही टीम लखनौ सुपर जायंट्स टीमला सामोरी गेली. धोनीबद्दल बोलायचं झालं तर या सीझनमध्ये तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. केकेआर टीमविरुद्धच्या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकवल्यानंतर धोनीने लखनौविरुद्ध 266 च्या स्ट्राईकरेटने बॅटिंग केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Csk, Gautam gambhir, Ipl 2022, Lucknow Super Giants, MS Dhoni