मुंबई, 1 एप्रिल : आयपीएल स्पर्धेचं चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) 6 विकेट्सनं पराभव केला. रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) कॅप्टनशिपमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या सीएकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 210 रन केले होते. लखनऊनं 211 रनचं अवघड आव्हान 3 बॉल राखत पूर्ण केलं. आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईनं सिझनमधील पहिल्या दोन मॅच गमावल्या आहेत. चेन्नईचा कॅप्टन जडेजानं या पराभवाचं कारण सांगितलं आहे. चेन्नईला खराब फिल्डिंगचा फटका सहन करावा लागला असं मत जडेजानं व्यक्त केलं आहे. सीएसकेच्या फिल्डर्सनी डी कॉक आणि केएल राहुल या दोघांनाही जीवदान दिलं. त्यांनी 99 रनची ओपनिंग पार्टनरशिप करत विजयाचा पाया रचला. जडेजानं मॅचनंतर सांगितलं की, ‘आम्ही सुरूवात खूप चांगली केली होती. पण, मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला चांगली फिल्डिंग करत कॅच घेणे आवश्यक आहे. आम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकलो असतो. मैदानात खूप दव होता. त्यामुळे बॉल हातामध्ये येत नव्हता. आम्हाला ओल्या बॉलनं सराव करायला हवा.’ जडेजानं यावेळी टीमच्या बॅटींगची प्रशंसा केली. ‘टॉप 6 बॅटर्सनी दमदार कामगिरी केली. बॅटींगसाठी पिच चांगले होत. बॉलिंगच्या बाबतीमध्ये आम्हाला नव्या योजनेवर काम करावे लागेल.’ लखनऊ सुपर जायंट्सनं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 34 रन हवे होते. त्यावेळी जडेजानं 19 वी ओव्हर ऑल राऊंडर शिवम दुबेकडे दिली. त्याचा हा निर्णय फसला. त्याच्या ओव्हरमध्ये 25 रन गेले आणि मॅच लखनऊच्या बाजूने झुकली. IPL 2022 : CSK च्या पराभवातही ड्वेन ब्राव्होनं रचला इतिहास, मलिंगाला टाकलं मागं यापूर्वी टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं 7 आऊट 210 रन केले. चेन्नईकडून अनुभवी रॉबिन उथप्पानं सर्वाधिक 50 रन केले. मोईन अली (35) आणि शिवम दुबे (49) यांनी फटकेबाजी करत चेन्नईचा स्कोर 150च्या पार पोहचवला. त्यानंतर जडेजा (9 बॉल 17) आणि महेंद्रसिंह धोनी ( 6 बॉल नाबाद 16) यांनी चेन्नईला 210 रनचा टप्पा गाठून दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.