जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'प्लिज माही निवृत्तीतून कमबॅक करं', टीम इंडियाच्या माजी बॉलरने इंस्टा पोस्ट करत केली मागणी

'प्लिज माही निवृत्तीतून कमबॅक करं', टीम इंडियाच्या माजी बॉलरने इंस्टा पोस्ट करत केली मागणी

mahendra singh dhoni

mahendra singh dhoni

मुंबईने दिलेल्या 156 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला (MI vs CSK) शेवटच्या बॉलला विजयासाठी 4 रनची गरज होती, तेव्हा धोनीने फोर मारून चेन्नईला रोमांचक विजय मिळवून दिला. त्यामुळे क्रिकेट जगतात धोनीने पुन्हा कमबॅक कराव अशी चर्ची रंगली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 एप्रिल: एमएस धोनीच्या (MS Dhoni) धमाकेदार बॅटिंगने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2022) विजय हिरावून घेतला आहे. मुंबईने दिलेल्या 156 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला (MI vs CSK) शेवटच्या बॉलला विजयासाठी 4 रनची गरज होती, तेव्हा धोनीने फोर मारून चेन्नईला रोमांचक विजय मिळवून दिला. त्यामुळे क्रिकेट जगतात पुन्हा धोनीच्या फिनीशींगची चर्चा सरु आहे. अशातच टीम इंडियाच्या एका माजी बॉलरने धोनीकडे निव़त्तीतून कमबॅक कर अशी मागणी केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे. कालच्या सामन्यात धोनीने अगदी शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला विजयाच्या वाटेवर आणलं. यापूर्वीही अनेक सामन्यांमध्ये धोनीने उत्तर फिनीशरची भूमिका बजावली आहे. त्याच्या या खेळीनंतर चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. IPL 2022 : धोनीनं शेवटच्या बॉलवर जिंकून दिली मॅच, CSK च्या नावावर खास रेकॉर्डची नोंद दरम्यान, धोनीचा सहकारी आणि टीम इंडियाचा माजी बॉलर आपपीसिंगने धोनिकडे कमबॅकर करण्याची मागणी केली आहे. त्याच्या या मागणीवर धोनी काय उत्तर देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. आरपी सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने त्याचा आणि धोनीचा एक फोटो पोस्ट केला आहे. आणि खास कॅप्शन दिली आहे. आपण माहीला टी- 20 वर्ल्डकपसाठी निवृत्तीचा विचार सोडण्यासाठी आग्रह धरु शकतो का? असा सवाल त्याने माहीच्या चाहत्यांना सोशल मीडियावद्वारे केला आहे.

जाहिरात

त्याच्या या प्रश्नांवर कमेंट्स बॉक्स मध्ये येस या शब्दाचा धुराळ पाहायला मिळत आहे. अनेक चाहत्यांनी का नाही असे मत माहीला पुन्हा खेळण्यासाठी तयार करा असे म्हटले आहे. 2020 मध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप खेळायचा असल्याची इच्छा वर्तवली होती. मात्र कोरोनामुळे हा वर्ल्डकप पुढे ढकलण्यात आला होता. ज्यानंतर काही दिवसांनी धोनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएलच्या या मोसमातला मुंबई इंडियन्सचा हा लागोपाठ सातवा पराभव आहे. या हंगामात मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आली नाही. तर चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 2 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई नवव्या तर मुंबई शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात