मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : धोनीनं शेवटच्या बॉलवर जिंकून दिली मॅच, CSK च्या नावावर खास रेकॉर्डची नोंद

IPL 2022 : धोनीनं शेवटच्या बॉलवर जिंकून दिली मॅच, CSK च्या नावावर खास रेकॉर्डची नोंद

CSK vs MI: महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) शेवटच्या बॉलवर फोर लगावत सीएसकेला 3 विकेट्सनं विजय मिळवून दिला. या विजयासह सीएसकेच्या नावार एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुरूवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) ही लढत झाली. आयपीएलच्या 15 व्या सिझनमधील हा सर्वात थरारक सामना होता. मॅचचा निकाल काय लागणार हे शेवटच्या बॉलपर्यंत निश्चित नव्हते. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) शेवटच्या बॉलवर फोर लगावत सीएसकेला 3 विकेट्सनं विजय मिळवून दिला. या विजयासह सीएसकेच्या नावार एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात शेवटच्या बॉलवर सर्वाधिक विजय मिळवणारी टीम म्हणून सीएसकेनं रेकॉर्ड केला आहे. चेन्नईनं आत्तापर्यंत 8 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे.  मुंबई इंडियन्स या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या टीमनं आत्तापर्यंत 6 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे.

चेन्नईला विजयासाठी शेवटच्या 4 बॉलमध्ये 16 आणि शेवटच्या बॉलवर 4 रनची आवश्यकता होती. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) हे सर्व रन करत चेन्नईला विजय मिळवून दिला. जयदेव उनाडकतच्या शेवटच्या बॉलवर फोर लगावत धोनीनं टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हा चेन्नई सुपर किंग्सचा या सिझनमधील दुसराच विजय असून मुंबईचा सलग सातवा पराभव आहे.

शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 17 रन हवे होते, तेव्हा उनाडकटने पहिल्या बॉलला प्रिटोरियसची विकेट घेतली, यानंतर बॅटिंगला आलेल्या ब्राव्होने एक रन काढून धोनीला स्ट्राईक दिला. तिसऱ्या बॉलला धोनीने सिक्स मारली, मग चौथ्या बॉलला फोर मारून सीएसकेला विजयाजवळ पोहोचवलं. पाचव्या बॉलला 2 रन काढल्यानंतर शेवटच्या बॉलला सीएसकेला 4 रन हव्या होत्या, तेव्हा धोनीने फोर मारून मुंबईच्या हातचा विजयाचा घास हिरावून घेतला.

IPL 2022 : संकटातील मुंबई इंडियन्ससाठी सचिनची बॅटींग, टीमला दिला खास मंत्र!

चेन्नईनं या विजयासह 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याची आशा कायम ठेवली आहे. चेन्नईचा कॅप्टन रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) हा विजय मिळवताच सुटकेचा निश्वास सोडला. जडेजासाठी गुरूवारचा दिवस खराब गेला. त्यानं दोन कॅच सोडले. तसंच तो फक्त 3 रन काढून आऊट झाला होता. जडेजा आऊट झाल्यानंतर चेन्नईच्या हातातून निसटलेली मॅच धोनीनं पुन्हा एकदा खेचून आणली.

First published:

Tags: Cricket, Csk, Ipl 2022, MS Dhoni, Mumbai Indians