मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : बायो-बबलबाहेर येताच Ajinkya Rahane ने घेतली नवी कार, किंमत ऐकून बसेल शॉक!

IPL 2022 : बायो-बबलबाहेर येताच Ajinkya Rahane ने घेतली नवी कार, किंमत ऐकून बसेल शॉक!

टीम इंडियाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आणखी एक कार विकत घेतली आहे. आयपीएलच्या (IPL 2022)  बायो-बबल बाहेर येताच रहाणेच्या घरी नवी कार दाखल झाली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 मे : टीम इंडियाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आणखी एक कार विकत घेतली आहे. आयपीएलच्या (IPL 2022)  बायो-बबल बाहेर येताच रहाणेच्या घरी नवी कार दाखल झाली आहे. आयपीएलमध्ये तो केकेआरकडून खेळत होता. त्याची टीम आधीच प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली. रहाणेची कामगिरीही या आयपीएलमध्ये निराशाजनक झाली, ज्यामुळे त्याला काही सामन्यांमधून बाहेरही ठेवण्यात आलं.

रहाणेने बीएमडब्ल्यू कारच्या (BMW Car) सीरिजमधलं मॉडेल 6 विकत घेतलं आहे. त्याने 630i M Sport हे व्हेरियंट खरेदी केलं. रहाणेच्या या कारचा रंग पांढरा आहे, तसंच किंमत जवळपास 70 लाख रुपये आहे. ही कार मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आली होती. रहाणेकडे बऱ्याच महागड्या कारचं कलेक्शन आहे. त्याच्याकडे Audi Q5 देखील आहे, ज्यातून तो बऱ्याच वेळा प्रवास करताना दिसला. रहाणेशिवाय बऱ्याच भारतीय खेळाडूंकडेही बीएमडब्ल्यू सीरिज 6 कार आहेत. मागच्या वर्षी पृथ्वी शॉनेही BMW 630i M Sport विकत घेतली होती.

रहाणेचा फ्लॉप शो

आयपीएल 2022 आधी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने (KKR) रहाणेला 1 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्याआधी आयपीएल 2021 मध्ये रहाणे दिल्लीकडून खेळला होता. या सिझनच्या सुरुवातीला रहाणे केकेआरकडून ओपनिंगला खेळला, पण दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला.

आयपीएल 2022 च्या 7 सामन्यांमध्ये रहाणेने 19 च्या सरासरीने आणि 103.90 च्या स्ट्राईक रेटने 133 रन केले. 44 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. संपूर्ण मोसमात त्याने 14 फोर आणि 4 सिक्स मारल्या.

First published:

Tags: Ajinkya rahane, Ipl 2022, KKR