जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडल्यानंतर विराट आणखी एक धक्का देणार!

IPL 2021 : टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडल्यानंतर विराट आणखी एक धक्का देणार!

IPL 2021 : टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडल्यानंतर विराट आणखी एक धक्का देणार!

विराट कोहलीने भारताच्या टी-20 टीमचं नेतृत्व सोडण्याचा (Virat Kohli Captaincy) निर्णय घेतला आहे. गुरुवारी विराटने ही मोठी घोषणा केली. टी-20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) त्याची कर्णधार म्हणून अखेरची स्पर्धा असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 सप्टेंबर : विराट कोहलीने भारताच्या टी-20 टीमचं नेतृत्व सोडण्याचा (Virat Kohli Captaincy) निर्णय घेतला आहे. गुरुवारी विराटने ही मोठी घोषणा केली. टी-20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) त्याची कर्णधार म्हणून अखेरची स्पर्धा असेल. यानंतर तो वनडे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून कायम राहिल. विराटने हा निर्णय घेतल्यानंतर आता तो आयपीएलमध्ये (IPL)  रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं (RCB) कर्णधारपदही सोडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. विराटने कर्णधार म्हणून टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं, पण त्याचं आयपीएलमधलं कॅप्टन्सीचं रेकॉर्ड खराब आहे. विराटने आरसीबीला एकही ट्रॉफी जिंकवून दिलं नाही, एवढच नाही तर त्याची विजयाची टक्केवारीही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 6 महिन्यांपासून सुरु होता विराट आणि BCCI यांच्यातील संघर्ष, वाचा Inside Story 2013 साली विराट कोहलीला आरसीबीचं नेतृत्व देण्यात आलं, यानंतर त्याच्या नेतृत्वात टीमला 60 मॅच जिंकता आल्या, तर त्यांना 65 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीची विजयी टक्केवारी 48.04 एवढी आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 60.16 टक्के मॅच जिंकल्या आहेत. एवढच नाही तर रोहितने मुंबईला पाचवेळा चॅम्पियन बनवलं आहे. एवढं खराब रेकॉर्ड असताना विराट बँगलोरचा कर्णधार राहणं कठीण वाटत आहे. बँगलोरच्या टीमने विराटवर मागची 8 वर्ष विश्वास दाखवला, पण आयपीएल 2021 विराटसाठी अखेरची संधी ठरू शकते. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 10 टीम खेळणार आहेत, तसंच खेळाडूंचा मेगा ऑक्शनही होणार आहे. यावेळी बँगलोरला ट्रॉफी जिंकता आली नाही, तर टीम विराटच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची शक्यता आहे. IPL 2021 : प्ले-ऑफ मध्ये पोहोचणं या 2 टीमसाठी सोपं, मुंबई अडचणीत! भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनीही असाच इशारा केला आहे. हिंदुस्तान टाईम्ससोबत बोलताना वेंगसरकर म्हणाले, ‘विराटला आरसीबीने भरपूर वेळ दिला आहे. जर तुमच्याकडे वर्ल्ड क्लास बॅटिंग आहे, वर्ल्ड क्लास बॉलिंग आहे, तरी तुम्हाला इतक्या वर्षात चॅम्पियन बनता आलं नाही, तर नेतृत्व बदलण्याची गरज आहे.’ मुंबई इंडियन्स होणार नवं सत्ताकेंद्र, 2 दिग्गज सांभाळणार टीम इंडियाची जबाबदारी!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात