• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : प्ले-ऑफ मध्ये पोहोचणं या 2 टीमसाठी सोपं, मुंबई अडचणीत!

IPL 2021 : प्ले-ऑफ मध्ये पोहोचणं या 2 टीमसाठी सोपं, मुंबई अडचणीत!

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या दुसऱ्या राऊंडला (IPL 2021) 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचणं (IPL Play Off Equation) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि चेन्नई सुपरकिंग्सना (CSK) सोपं जाऊ शकतं.

 • Share this:
  दुबई, 17 सप्टेंबर : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या दुसऱ्या राऊंडला (IPL 2021) 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला राऊंड एप्रिल-मे महिन्यात भारतात झाला होता, पण बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. आता युएईमध्ये आयपीएलचे उरलेले सामने खेळवले जाणार आहेत. इथल्या खेळपट्टीवर टीमना नव्या रणनितीसह उतरावं लागणार आहे. जी टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, त्यांनाही नव्याने सुरुवात करावी लागणार आहे, तर पहिल्या राऊंडमध्ये संघर्ष करणाऱ्या टीमना आता एकही चूक महागात पडू शकते. प्ले-ऑफमध्ये पोहोचणं (IPL Play Off Equation) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि चेन्नई सुपरकिंग्सना (CSK) सोपं जाऊ शकतं. दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 6 विजय मिळवणाऱ्या दिल्लीला प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त 2 विजयांची गरज आहे. ऋषभ पंतच्या टीमने 8 मॅचमध्ये 12 पॉईंट्स मिळवले आहेत. दिल्लीच्या उरलेल्या मॅच सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत आहे. चेन्नई-बँगलोरही प्ले-ऑफमध्ये? चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 7 पैकी 3 मॅच जिंकाव्या लागणार आहेत. धोनीच्या टीमकडे सध्या 5 विजयांसह 10 पॉईंट्स आहेत. चेन्नईचे उरलले सामने मुंबई, बँगलोर, कोलकाता, हैदराबाद, राजस्थान, दिल्ली आणि पंजाबविरुद्ध आहेत. विराट कोहलीच्या (Virat Kohli) बँगलोरलाही (RCB) प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 7 पैकी 3 मॅच जिंकणं गरजेचं आहे. बँगलोरच्या खात्यातही 10 पॉईंट्स आहेत. बँगलोर उरलेले सामने कोलकाता, चेन्नई, मुंबई, राजस्थान, पंजाब, हैदराबाद आणि दिल्लीविरुद्ध खेळणार आहे. मुंबई अडचणीत आयपीएल इतिहासात सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईसाठी (Mumbai Indians) संथ सुरुवात महागात पडू शकते. प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुंबईला 7 पैकी 4 मॅच जिंकाव्या लागणार आहेत. मुंबई युएईमध्ये चेन्नई, कोलकाता, बँगलोर, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. मुंबईची ओळख संथ सुरुवात करणारी टीम अशी झाली आहे, यावेळी मात्र अशी सुरवात त्यांना महागात पडू शकते. राजस्थान रॉयल्सना (Rajasthan Royals) 7 पैकी 5 मॅच जिंकणं गरजेचं आहे. राजस्थानच्या खात्यात सध्या 6 पॉईंट्स आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणारी राजस्थान त्यांच्या उरलेल्या मॅच पंजाब, दिल्ली, हैदराबाद, बँगलोर, चेन्नई, मुंबई आणि कोलकाताविरुद्ध खेळणार आहे. IPL 2021 : मुंबईने 'ती' सवय बदलली नाही तर CSK होणार चॅम्पियन! रोहितसाठी धोक्याची घंटा पंजाब, कोलकाता, हैदराबादसाठी करो या मरो पंजाब किंग्सला (Punjab Kings) प्ले-ऑफमध्ये पोहोचायचं असेल, तर त्यांना 6 पैकी 5 मॅच जिंकाव्या लागणार आहेत. केएल राहुलच्या टीमला उरलेल्या मॅच राजस्थान, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, बँगलोर, चेन्नईविरुद्ध खेळायच्या आहेत. कोलकात्याला (KKR) प्ले-ऑफमध्ये जायचं असेल तर 7 पैकी 6 मॅच जिंकाव्या लागणार आहेत. त्यांचे सामने पंजाब, हैदराबाद, मुंबई, पंजाब, बँगलोर आणि चेन्नईविरुद्ध होणार आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचायचं सगळ्यात कठीण आव्हान हैदराबादच्या (SRH) टीमला आहे. हैदराबादला त्यांच्या उरलेल्या 7 पैकी 7 सामने जिंकावेच लागणार आहेत. एकही पराभव त्यांचं प्ले-ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगवू शकतो. हैदराबादचे उरलेले सामने राजस्थान, पंजाब, मुंबई, कोलकाता, बँगलोर आणि चेन्नईविरुद्ध असतील.
  Published by:Shreyas
  First published: