मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 मधून बाहेर पडूनही ऑस्ट्रेलियन या पंचाना गाठता आला नाही मायदेश, हे आहे कारण

IPL 2021 मधून बाहेर पडूनही ऑस्ट्रेलियन या पंचाना गाठता आला नाही मायदेश, हे आहे कारण

ऑस्ट्रेलियन पंच पॉल रिफेल (Paul Reiffel) यांनी काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2021 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, ते अद्याप भारतातून आपल्या देशात परत गेलेल नाहीत.

ऑस्ट्रेलियन पंच पॉल रिफेल (Paul Reiffel) यांनी काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2021 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, ते अद्याप भारतातून आपल्या देशात परत गेलेल नाहीत.

ऑस्ट्रेलियन पंच पॉल रिफेल (Paul Reiffel) यांनी काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2021 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, ते अद्याप भारतातून आपल्या देशात परत गेलेल नाहीत.

नवी दिल्ली, 1 मे : ऑस्ट्रेलियन पंच पॉल रिफेल (Paul Reiffel) यांनी काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2021 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, ते अद्याप भारतातून आपल्या देशात परत गेलेल नाहीत. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्तानुसार रायफल आता आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरित सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करणार आहेत आणि स्पर्धा संपल्यानंतरच ते आपल्या देशात परततील. रायफल यांच्या बरोबरच भारतीय पंच नितीन मेनन (Nitin Menon) यांनीही आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेनन यांची आई आणि पत्नी यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची देखभाल करण्यासाठी आणि इंदूर येथे आपल्या घरी परतण्यासाठी मेनन स्पर्धा अर्धवट सोडली आहे.

रायफल यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील हॉटेलमधून आपले सामान त्यांनी पॅक केले होते आणि दोहा ते सिडनीला जाण्यासाठी विमानाचे तिकीटही बुक केले होते. पण तेव्हाच मला कळले की, मी जाऊ शकत नाही. मी भारताबाहेर जाण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण, दोहाहून मी माझी फ्लाईट पकडू शकलो नाही. मला माहीत होते की, काही लोक याच मार्गाने घरी परतले होते. पण मी जाण्यापूर्वी हा प्रवास बंद झाला. म्हणून मला इथेच रहावे लागले.

हे वाचा-IPL 2021: डीव्हिलियर्सला जाळ्यात कसं अडकवलं? पंजाबच्या बॉलरनं केला खुलासा

रायफल यांचा पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये समावेश

ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज रायफल सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (ICC) पंचांच्या एलिट पॅनेलचे सदस्य आहेत. सध्या आयपीएलमध्ये पंच म्हणून देखील काम करत आहेत. रायफलने गुरुवारी सांगितले, की मी दहा मिनिटांत आयपीएलचा बायो-बबल सोडणार होतो. पण, नंतर मला कळलं की प्रवासाच्या निर्बंधामुळे मी दोहा मार्गे ऑस्ट्रेलियाला परत जावू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने 15 मेपर्यंत भारतातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे.

आपल्या माघारी परतण्याच्या प्रवासाच्या बदलांविषयी माहिती घेण्यापूर्वी रायफल यांनी बायोबबल सोडले असते, तर ते मध्येच अडकून पडले असते. त्यानंतर आयपीएलमधील उर्वरित सामन्यात पंच होण्यापूर्वी त्यांना नियमानुसार काही दिवस विलगीकरणात राहावे लागले असते.

हे वाचा - राजस्थानच्या खेळाडूच्या आजोबांचे कोरोनामुळे निधन, 'त्यानं' घेतला मोठा निर्णय

दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये भाग घेतलेले तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू अ‍ॅडम जम्पा (आरसीबी), केन रिचर्डसन (आरसीबी) आणि अँड्र्यू टाई (राजस्थान) या स्पर्धेतून माघार घेत आहेत. याशिवाय भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही कुटुंबातील सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

First published:
top videos

    Tags: Australia, IPL 2021, Ipl 2021 auction